Marathipepar प्रतिनिधी [ Regarding implementation of revised PM Insurance Scheme in the state for Kharif season 2025 and Rabi season 2025-26 ] : सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करीता राज्यात राबविणेबाबत कृषी व पदुम विभाग मार्फत दिनांक 24 जुन 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या 01 वर्षाकरीता अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . त्यानुसार 01 वर्ष करीता कंपन्यांची अमंमलबजावणी यंत्रणंची निवड करण्यात आलेली आहे .
योजनेत समाविष्ट पिके व शेतकरी :
पीक वर्गवारी | खरीप हंगाम | रब्बी हंगाम |
गळीत धान्य पिके | भुईमूग , कारळे , तीळ , सोयाबीन | उन्हाळी भुईमुग |
नगदी पिके | कापुस , खरीप कांदा | रब्बी कांदा |
तृणधान्य व कडधान्य पिके | खरीप ज्वारी , बाजरी , भात , नाचणी , मूग , उडीद , तुर मका | रबी ज्वारी , गहू , हरभरा , उन्हाळी भात |
शेतकऱ्यांनी योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे / विमा हप्त्याची रक्कम कर्जदार अथवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था / आपले सरकार सेवा केंद्र / बँक / विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे / शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक खरीप हंगाम करीता दि.31.07.2025 अशी असणार आहे . तर रब्बी हंगाम करीात 30.11.2025 अशी असेल .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) …
- राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 55% DA वाढीचा अधिकृत निर्णय (GR) 31 जुलै अखेर !
- 10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश !
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर धडक मोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
- राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.07.2025