@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Corrigendum issued on 25.06.2025 regarding development of appointment to retirement system of state employees ] : नियुक्ती ते सेवानिवृत्ती ही प्रणाली राज्य कर्मचाऱ्यांसाठी विकसित करण्यात येत आहेत . या संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.06.06.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयांमध्ये सुधारणा करण्यात येवून दि.25.06.2025 शासन शुद्धीपत्रक काढण्यात आले आहे .
दि.06.06.2025 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद 01 मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे . यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , नियुक्ती ते सेवानिवृत्ती पर्यंतच्या सेवा प्रदान करण्या करीता ई- गव्हर्नस मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याकरीता NICSI या संस्थेस 7,49,40,149/- रुपये इतकी रक्कम प्रदान करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
या ऐवजी नियुक्ती ते सेवानिवृत्ती पर्यंतच्या सेवा प्रदान करण्याकरीता ई- गव्हर्नस प्रकल्प अंतर्गत मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याकरीत NICSI या संस्थेस 7,49,40,149/- रुपये इतकी रक्कम वित्त विभाग शासन निर्णय दि.17.04.2015 मधील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका – 1978 भाग पहिला , उप विभाग – 02 मधील नियम क्र.34
नुसार अधिदान व लेखा कार्यालयास संक्षिप्त देयकावर प्रदान करण्यास शासन मान्यता देणयत येत आहे , असे वाचण्याचे यावे अशी सुधारणा करण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : दि.30 जून पर्यंत राज्यातील या जिल्ह्यांना जोरदार मुसळधार पावसाचा इशारा ..
तसेच सदर शासन निर्णयातील परिच्छेद 03 नंतर परिच्छे 03 ( अ ) अंतभुत करण्यात येत आहे . यांमध्ये सदर निर्णयातील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 शासन निर्णय वित्त विभाग क्र.विअप्र- 2013 मधील भाग पहिला , उपविभाग 02 मधील अनुक्रमांक 27 अ नियम क्र.76 नुसार प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे .

- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) …
- राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 55% DA वाढीचा अधिकृत निर्णय (GR) 31 जुलै अखेर !
- 10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश !
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर धडक मोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
- राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.07.2025