@marathipepear खुशी पवार प्रतिनिधी [ Review of compulsory retirement for state officers/employees at the age of 50/55 or after 30 years of service ] : मृदा व जलसंधारण विभाग मार्फत दिनांक 01 जुलै 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार 50/55 व्या वर्षी अथवा 30 वर्षे सेवा झालेल्या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्तीबाबत पुनर्विलोकन समितीचे गठण करण्यात आले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 च्या नियम 10 ( 4 ) , नियम 65 अ नुसार , सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी / कर्मचारी यांना वयाच्या 50/55 व्या वर्षी अथवा 30 वर्षे सेवा या पैकी जे अगोदर घडेल तेंव्हा सेवेत राहण्याची पात्र / अपात्रता आजमविणे करीता …
सदर अधिकारी / काम करण्यास सुयोग्य / कार्यक्षम अधिकारी / कर्मचारी यांना शासन सेवेत पुढे चालु ठेवावे व अकार्यक्षम , तसेच संशयास्पद सचोटी असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना शासन सेवेतून मूदतपुर्व निवृत्त करण्याचे शासनांचे धोरण आहे .
हे पण वाचा : NPS धारकांसाठी महत्त्वपूर्ण माहिती ..
सदर निर्णयाच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण विभाग अधिनस्त पुनर्विलोकन करीता पात्र होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना वयाच्या 50/55 वर्षापलिकडे अथवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षे सेवा पुर्ण झालेल्यांची सेवेत राहण्याची पात्र / अपात्रता तपासुन त्यांची पुनर्विलोकन करीता शिफारस करण्याचे निर्देश आहेत .
सदर पुनर्विलोकन समितीमध्ये सह/ उप सचिव ( आस्थापना ) – मृदा व जलसंधारण अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली 03 सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे .


- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !