@marathipepar चंदना पवार प्रतिनिधी [ State employees will get increased allowance along with arrears from the Sixth Pay Commission ] : वित्त विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वाढीव भत्तासह चक्क सहावा वेतन आयोगापासुन फरक मिळणार आहे .
राज्यातील आदिवासी / नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरीता वेतनात दरमहा प्रोत्साहन देण्याची तरतुद आहे . सदर तरतुद ही पाचवा वेतन आयोगापासुन करण्यात आलेली आहे . परंतु या संदर्भात वेतन आयोगानुसार सुधारित शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले नाहीत .
यामुळे पाचवा वेतन आयोगांमध्ये करण्यात आलेली प्रोत्साहन भत्ताची तरतुद लागु करण्याचे निर्देश वित्त विभाग मार्फत देण्यात आले आहेत .यानुसार आदिवासी / नक्षलग्रस्त भागांमध्ये वास्तव करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहावा / सातवा वेतन आयोगापासुन फरकासह मुळ वेतनाच्या 15 टक्के किमान 200/- रुपये ..
व कमाल 1500/- या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . यामुळे आता सहावा वेतन आयोगापासुन म्हणजेच सन 2006 पासुन प्रोत्साहन भत्ता फरक कर्मचाऱ्यांना अदा केले जाणार आहेत .
व वित्तमान वेतनात कमाल 1500/- या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .या संदर्भात वित्त विभाग लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य संचालक यांचे दिनांक 08.12.2025 रोजी निर्देश देण्यात आले आहेत .
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण माहिती …
- राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना केंद्राप्रमाणे वाढीव 3% ( 58% प्रमाणे ) डी.ए चा लाभ जानेवारी वेतन / पेन्शन देयकासोबत ..
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव भत्तासह सहावा वेतन आयोगापासुन थकबाकी रक्कम मिळणार ; जाणुन घ्या वित्त विभाग परिपत्रक ..
- मोठी बातमी : राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणांच्या अंमलबाजवणीस अखेर मंजूरी ; GR दि.15.12.2025
- नविन वेतन आयोगात किमान 20% पगारवाढ मिळणार ; जाणून घ्या आकडेवारी ..