@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued by the Finance Department regarding the next phase of salary fixation for state employees in the revised pay scale dated 19.12.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणींमध्ये वेतननिश्चिती पुढील टप्यावर करणेबाबत , वित्त विभाग मार्फत दिनांक 19.12.2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वेतनत्रुटी निवारण समिती 2024 ने करण्यात आलेल्या शिफारशीनुसार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजीच्या GR नुसार सुधारित वेतनश्रेणींमध्ये वेतननिश्चिती करताना ज्या कर्मचाऱ्यांचे यापुर्वीचे असुधारित वेतनश्रेणीमधील वेतन ..
त्यापेक्षा सुधारित वेतनश्रेणींमध्ये वेतन कमी निश्चित होत असल्यास अशा प्रकरणी सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांचे त्या वेतनश्रेणीत पुढील टप्यावर वेतननिश्चिती करणेबाबत वित्त विभागाच्या दिनांक 02.06.2025 रोजीच्या GR नुसार मान्यता देण्यात आलेली आहे .
त्याच अनुषंगाने दिनांक 28.04.2022 ( वित्त विभाग ) रोजीच्या अधिसुचना नुसार त्याचबरोबर दि.02.06.2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतनश्रेणींमध्ये वेतननिश्चिती करताना ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतनश्रेणी लागु करुन वेतननिश्चिती करतेवेळी जर वेतन हे पुर्वी पेक्षा कमी होत असेल ..
अश्या प्रकरणी अधिकारी / कर्मचाऱ्यांना त्या सुधारित वेतनश्रेणीत पुढील टप्यावर वेतन निश्चिती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच सदर प्रत्येक प्रकरणी लेखा व कोषागारे कार्यालयातील वेतन पडताळणी पथक यांच्याकडून काटेकोरपणे तपासणी करुन त्यानंतरच वेतनश्चिती करुन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- विशेष वेतन अदा करणेबाबत GR निर्गमित दि.26.12.2025
- 10 वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा पुर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणेबाबत GR निर्गमित दि.26.12.2025
- राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतननिश्चिती पुढील टप्यावर करणेबाबत वित्त विभाग मार्फत GR निर्गमित दि.19.12.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण माहिती …
- राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना केंद्राप्रमाणे वाढीव 3% ( 58% प्रमाणे ) डी.ए चा लाभ जानेवारी वेतन / पेन्शन देयकासोबत ..