Farmer Loan : शेतकऱ्यांना मिळत आहे फक्त 1 टक्के व्याजदाराने 3 लाख रुपयांचे कर्ज , शासनांकडून नविन शासन निर्णय निर्गमित ! दि.12.05.2023

Spread the love

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : सन 2023-24 मधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरण करणेबाबत , शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्के व्याज दराने अर्थसहाय्य करणेबाबत , राज्य शासनाकडून महत्वपूर्ण शासन निर्णय (GR ) दि.12.05.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनातील शेतकऱ्यांना 6 टक्के व्याज दराने अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे . या निर्णयानुसार केंद्र शासनाचे धोरणानुसार बँका ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना 7 टक्के ऐवजी शेतकऱ्यांना 6 टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करावा असे राज्य शासनाचे धोरण आहे . यासाठी राज्य शासनावर एक टक्का व्याज फरकाच्या रक्कमेचा अतिरिक्त आर्थिक भार आहे .

सन 2006-07 पासून खरीब व रब्बी हंगामामध्ये ,राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामिण बँका व सन 2013-14  पासून शेतकऱ्यांना रुपये 3 लाखापर्यंत अल्प मुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या राज्यातील खाजगी क्षेत्रातील बॅंक / वित्तीय संस्थांना सदर निर्णयाचा लाभ अनुज्ञेय करण्यात येत आहे .

हे पण वाचा : पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये करा गुंतवणूक आणि मिळवा मोठी रक्कम !

सन 2023-24 या चालू वर्षासाठी शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1 टक्का दराने अर्थ सहाय्य योजना अंतर्गत निधी मंजूर करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .सदर निर्णयानुसार सन 2023-24 वर्षात शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज  पुरवठा करण्यासाठी 1 टक्का दराने अर्थसहाय्य योजना अंतर्गत अर्थसहाय्य लेखाशिर्षाखाली रुपये 2400.00 लाख रुपये एवढा निधी वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे .

वित्त विभागाच्या दि.12.04.2023 मधील तपासणी सूचीप्रमाणे सर्व बाबींची विचार करुन मंजूर करण्यात आलेला निधी संबंधित बँका / संस्थांना वितरीत करताना आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर रकमेबाबत उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व त्याची प्रत राज्य शासनास सादर करण्यात यावी असे आदेश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील राज्य शासनांच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून दि.12 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202305121322392902 ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

शासन निर्णय

Leave a Comment