कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात राज्य शासनांकडून महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.10.05.2023

Spread the love

महाराष्ट्र शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक ग्रामविकास विभागांकडून दि.04 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रक राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांनी परिपत्रक सादर करण्यात आले आहेत .

यांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत दिनांक 07.04.2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित करणयत आले आहे .सदर धोरणानुसार सन 2022 मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पोर्टल द्वारे पारदर्शी पद्धतीने राबविण्यात आलेली आहे .

सदर प्रक्रिया राबविताना विविध शिक्षक संघटनाकडून प्राप्त झालेली निवेदने व न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता , सन 2023 साठी आंतरजिल्हा / जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबतच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा सुचविण्याकरीता दि.14.03.2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये अभ्यासगट गठीत करण्यात आलेला आहे .सदर अभ्यासगटाकडून प्राप्त होणाऱ्या सुचनानुसार दि.07.04.2021 रोजीच्या आंतरजिल्हा बदली बाबतच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरु आहे .

याकरीता सन 2023 साठी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने सदर खाली नमुद शासन परिपत्रकांमधील मुद्यांनुसार कार्यवाही करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद यांना कळविण्यात आले आहेत .

यांमध्ये बदली करताना निव्वळ रिक्तपदांची यादी , शिक्षकांचे रोस्टर , सन 2023 च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणारे जे शिक्षक पदोन्नत झालेले आहेत , अशा शिक्षकांनी स्वखुशीने पदावनत करण्याबाबत दिलेल्या संमती पत्राबाबत निर्णय घेण्याचे सुचना देण्यात आलेले आहेत .तसेच सन 2023 च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरुन काही न्यायालयीन / लोकायुक्त / अन्य न्यायाधिकण यांचे स्वयंस्पष्ट आदेश असल्यास , अशा आदेशांची प्रत मुळ याचिकेचे प्रत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत .

सदर बदली संदर्भातील दि.04.05.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहू शकता ..

शासन परिपत्रक

शासकीय कर्मचारी / पेन्शनधारक , नोकर पदभरती , राजकीय / क्रिडा / आर्थिक व इतर चालु घडामोडींच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment