Good News : सरकारी कर्मचाऱ्यांची एकता , NPS योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षी प्रभावाने मिळणार !

Spread the love

मराठी पेपर , बालाजी पवार : आज दिनांक 13 मे 2023 रोजी कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर झालेला असून ,जुनी पेन्शन योजना बाबत आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकतामुळे आता राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन परत पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे .

कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर झालेला असून , यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे फक्त 73 उमेदवार निवडून आले आहेत . तर राष्ट्रीय काँग्रेसचे 115 उमेदवार निवडून आले आहेत .तर जेडिएस पक्षाचे 30 उमेदवार निवडून आले आहेत . तर 06 अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत . या निकालावरुन राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष सर्वात मोठा पक्ष बनला आहे .

राज्य कर्मचाऱ्यांनी दाखवली एकता – कर्नाटक राज्यातील कर्मचाऱ्यांना विशेष : जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर मतदान केले आहेत असे एकंदरीत निकालावरुन दिसून येत आहेत . कारण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यांमध्येच नमुद केले होते कि , सत्ता स्थापन झाल्यास प्रथम राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येईल . आत्तापर्यंतच्या देशातील हिमाचल प्रदेश , छत्तीसगढ , झारखंड , राजस्थान याठिकाणी काँग्रेसची सत्ता स्थापन झालेली आहे .

काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ लागु करण्यात आलेला असल्याने , कर्नाटक राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी केलेल्या मतदानांचा खुप मोठे योगदान असल्याचे दिसून येत आहे .यामुळे कर्नाटकांमध्ये काँग्रेस पक्ष सत्ता स्थापन करणार व राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ लवकरात लवकर लागु करणार यामुळे कर्नाटक राज्यातील कर्मचारी मोठ्या प्रमाणांमध्ये खुश असल्याचे दिसून येत आहेत .

शासकीय कर्मचारी , नोकर भरती , शासकीय योजना , राजकिय बातमी / सांस्कृतिक तसेच चालु घडामोडींच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .

Leave a Comment