या शेतकऱ्यांना मिळत आहे शून्य व्याज दारात कर्ज! तुम्ही पात्र आहात का? पहा सविस्तर !

Spread the love

Crop Loan Scheme : शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामासाठी भांडवलाची आवश्यकता भासते. अशावेळी शेतकरी बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेतात आणि आपल्या कामासाठी भांडवलाची पूर्तता करतात. अलीकडे आपण बघितलेच असेल की निसर्गाच्या अनियमित वातावरणामुळे शेतकरी मित्रांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामध्ये गारपीट असो नैसर्गिक वादळ असो किंवा अवकाळी पाऊस असो यामुळे शेतकरी पूर्णपणे त्रासलेला आहे. या गोष्टीकडे विचार करून प्रशासनाने एक नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करत होते त्यांना मोठी सवलत देण्यात आली आहे…

तर खास नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने एक महत्वकांक्षी योजना राबवली असून त्या योजनेचे नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना. या योजनेचा लाभ घेऊन नक्कीच शेतकरी आर्थिक बाजूने बळकट होऊ शकतील.

Crop Loan Scheme

जे शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करत होते अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभ घेता येईल. ह्या अगोदर आपण नियमावलीकडे लक्ष केंद्रित केले तर आपल्याला असे दिसेल की जे शेतकरी पूर्वी पीक कर्जाची परतफेड नियमितपणे करत होते त्यांना एक लाखाच्या कर्जावर तब्बल तीन टक्क्यांची सवलत दिली जात होती. आणि जर एक लाख पेक्षा जास्त कर्ज असेल तर त्यावेळी शेतकऱ्यांना एक टक्के एवढे सवलत देण्यात येत होती. परंतु आता प्रशासनाने या सवलतीत मोठा बदल केला आहे. शेतकरी वर्गाला व्याजदरामध्ये आणखी जास्त सवलत दिली जाईल. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया याच व्याज सवलतीच्या योजनेबाबत सविस्तर माहिती.

केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व पात्र शेतकऱ्यांना सहा टक्के पर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना तीन टक्के व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी तीन टक्के असे सर्व मिळून सहा टक्के सवलत उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पीक कर्ज शेतकऱ्यांना अगदी शून्य व्याज दरात मिळेल. ज्या शेतकरी बंधू-भगिनींनी आपल्या जवळील खाजगी बँके मधून, ग्रामीण बँकेमधून, राष्ट्रीयकृत बँकेमधून, जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून किंवा इतर कोणत्याही बँकेमधून कर्ज उपलब्ध करून घेतले असेल तर त्यांच्या कर्जावर ही सवलत दिली जाईल. यासाठी शासनाच्या माध्यमातून 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या जिल्ह्यातील जवळपास दोन लाख 88 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर नक्की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल याबद्दल माहिती घेऊया.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काही दिवसातच पार पडले असून या अधिवेशनात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेबाबत सुद्धा मोठी घोषणा करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून फक्त पुणे जिल्ह्यामधील जवळपास दोन लाख 88 हजार शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांच्या गरजेनुसार निधी जमा केला जाईल असे प्रशासनाने सांगितले आहे…

Leave a Comment