@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government employees/pensioners to get 30th September ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकारकडून एक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे , सदर निर्णयानुसार कर्मचारी / पेन्शनधारकांना दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत डेटलाईन देण्यात आलेली आहे .
केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केल्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना नविन युपीएस ( युनिफाईड पेन्शन योजना ) योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . सदर नविन युनिफाईड पेन्शन योजनाचा विकल्प देण्यासाठी दि.30 जुन 2025 पर्यंत मुदत दिली होती .
सदर मुदत मध्ये नव्याने वाढ करुन दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सदर युनिफाईड पेन्शन योजनाचा विकल्प निवडता येणार आहे . यांमध्ये एनपीएस अथवा युपीएस यापैकी एका पेन्शन योजनाचा विकल्प कर्मचाऱ्यांना निवडावा लागणार आहे .
हे पण वाचा : 12 वी पात्रता धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज करायला विसरु नका !
सदर मुदतवाढ ही केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या मागणीनुसार वाढविण्यात आलेली आहे . ही मुदत अंतिम असल्याने , केंद्रीय कर्मचाऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत विकल्प नमुना भरुन कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचा आहे .
युपीएस पेन्शन योजनांमध्ये शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार असल्याने एनपीएस पेक्षा सदर पेन्शन प्रणाली फायदेशिर ठरणार आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) …
- राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 55% DA वाढीचा अधिकृत निर्णय (GR) 31 जुलै अखेर !
- 10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश !
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर धडक मोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
- राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.07.2025