@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important GR regarding regularization of services of contractual employees issued on 10.02.2026 ] : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.10.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , शासकीय व निमशासकीय आस्थापनेवरील तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या नियमित करण्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागांमध्ये उद्भवलेली प्रकरणे ..
व कायदेशिर बाजु लक्षात घेता सदर प्रस्तावा संदर्भात अभ्यास करुन वस्तुस्थिती दर्शक अहवाल शासनांस सादर करण्याकरीता राज्याचे मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 04 सदस्यीय अभ्यास समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .
उक्त समिती समारे शालेय शिक्षण व क्रिडा विभाग , पाणी पुरवठा विभाग , वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग , सार्वजनिक आरोग्य विभाग , व अशा इतर संबंधित विभागाच्या सचिवांनी त्यांच्या विभागाशी संबंधित योजना खालील तात्पुरत्या ( कंत्राटी ) नियुक्त्या नियमित करण्याबाबत…
उद्भवलेल्या प्रकरणाची वस्तुस्थिती , वित्तीय भार कायदेशीर बाबी तसेच भारत सरकार व इतर राज्यांतील अशा योजनाबाबत कार्यपद्धती इ. माहिती व अभिप्राय सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

- आठवा वेतन आयोगाचे संकेतस्थळ लाँच ; अधिकारी / कर्मचारी , पेन्शन धारकांमार्फत मागविण्यात आले मत व सुचना !
- कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.10.02.2026
- वेतनत्रुटी निवारण समिती अहवालातील निवडश्रेणीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत GR निर्गमित दि.10.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांची डी.ए वाढीची प्रतिक्षा संपली ; केंद्राप्रमाणे 58% दराचे डी.ए वाढीचा अधिकृत्त GR याच महिन्यात !
- ऑनलाईन बदली बाबत परिपत्रक निर्गमित दि.05.02.2026