राज्यात पुढील 3 ते 4 दिवसांत पुन्हा पावसाचा जोर वाढणार ; जाणुन घ्या नविन अंदाज !

Spread the love

Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra new rain update new ] : राज्यात पुढील 3 ते 4 दिवसांत पुन्हा पावसाचा जोर अधिकच वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामन खात्यांकडून वर्तविण्यात आला आहे . मागील 2 आठवड्यांपासून पावसाची राज्यात उघझाप होत आहे , सदर कालाधीमध्ये राज्यात जोचाराचा पाऊस पडला आहे .

त्यानंतर पावसाने मोठी विश्रांती घेतली होती , आता परंत एकदा राज्यात पुढील 3 ते 4 दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज पुणे हवामान खात्याचे प्रमुख डॉ.के.एस होसाळीकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे . त्यांच्या सांगण्यानुसार राज्यात पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यात काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे , तर तुरळक ठिकाणी विजेच्या गर्जनांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

तर मुंबई हवामान खात्यांकडून दिलेल्या अंदाजानुसार राज्यात दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक अशा ठिकाणी विजेच्या गर्जांनासह वादळी वाऱ्यांचा ( वाऱ्याचा वेग  प्रति तास 30-40 किमी ) व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तब्बल 394 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , राज्यात दिनांक 16 ऑगस्ट ते दिनांक 18 ऑगस्ट 2024 पर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे . यापैकी राज्यात दिनांक 17 ऑगस्ट रोजी पावसाची मराठवाडा सह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आली आहे .

आता यापुढे पावसाचे प्रमाण कमी होणार आहेत , परंतु कमी – अधिक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

Leave a Comment