बदली बाबत शिक्षकाच्या विविध मागण्यांवर बैठक अखेर संपन्न ; जाणुन घ्या बैठकीतील सविस्तर मुद्दे !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Meeting on various demands of teachers regarding transfer finally concluded ] :  राज्यातील शिक्षकांच्या बदली बाबत असणाऱ्या विविध मागण्यांबाबत काल दिनांक 17 मार्च 2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती .

सदर बैठक ही ग्रामविकास विभागाच्या सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघटनांच्या विविध पदाधिकारी समवेत संपन्न झाली आहे . सदर बैठकीमध्ये शिक्षक बदल्यांच्या विविध मागणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे . सदर बैठकीमध्ये शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील मुद्दे उपस्थित केले .

1.बदली / पदोन्नती / दिनांक : जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया मध्ये 53 वर्षे पुर्ण होण्याची तारीख 31 मे अशी आहे , त्याऐवजी 30 जुन ही तारीख ग्राह्य धरण्यात यावी असे नमुद करण्यात आले , तसेच बदली करण्यापुर्वी विस्तार अधिकारी , केंद्र प्रमुख , मुख्याध्यापक अशा पदांच्या पदोन्नती प्रक्रिया पुर्ण करण्यात यावे .

02.आजारी पाल्य : ज्या शिक्षकांचे पाल्य हे दुर्धर अथवा गंभीर आजारी आहेत , अशा शिक्षकांना बदलीकरीता संवर्ग – 01 मध्ये लाभ दिला जावा , असा मुद्दा संघटनेकडून मांडला .

03.बदली प्रक्रिया मध्ये सामावून घेण्याची मागणी : सन 2018 व सन 2022 च्या अवघड क्षेत्राच्या यादीमध्ये समाविष्ट असणारे परंतु दिनांक 18.06.2024 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये सोपेमध्ये समाविष्ट असणारे शाळेतील शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला .

हे पण वाचा : आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025

04.आंतरजिल्हाने बदली झालेल्या शिक्षकांची बदली ही सेवा ज्येष्ठता पुर्वीच्या जिल्ह्याची धरण्याची मागणी करण्यात आली .

05.याशिवाय पुणे जिल्हा मध्ये मुख्याध्यापक यांच्या रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया पुर्ण करुन रिक्त असणाऱ्या मुख्याध्यापकांच्या जागा ह्या तातडीने भरण्यात यावे असा मुद्दा संघटनेकडून अधोरेखित करण्यात आला .

यावेळी मा. आमदार अभिमन्यू पवार , श्री.सत्यजित तांबे , श्री.सुरेश धस , तसेच निरंजन डावखरे व संजय केळकर तसेच ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री एकनाथ डवले यांच्यासह संघटनेचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment