राज्यात भरली शासकीय योजनांची जत्रा! अशाप्रकारे 27 लाख नागरिकांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ !

Spread the love

मराठी पेपर टीम , प्रतिनिधी प्रणिता : प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 75000 लाभार्थी व्यक्तींना विविध योजनांचा थेट लाभ घेता येणार आहे. अशी शासकीय योजना राबवली आहे. त्या योजनेचे नाव आहे शासकीय योजनांची जत्रा. 15 एप्रिल पासूनच ही योजना सर्वत्र राबविण्यात आली असून सरकारची ही जत्रा 15 जून पर्यंत चालू राहील. या योजनेच्या माध्यमातून जवळपास 27 लाख लाभार्थी व्यक्तींना लाभ भेटेल.

हा उपक्रम सर्वत्र यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विविध उपायोजना व उत्तम नियोजन केले पाहिजे. अशी एक महत्वाची अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. शासकीय योजनांची जत्रा सर्वसामान्य नागरिकांचे विकासाची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ मिळवून देणे हे आपले प्रमुख काम आहे. असे देखील त्यांनी सांगितले.

अभियानाच्या माध्यमातून अमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर यासोबतच तालुका निहाय जनकल्याण कक्षची स्थापना करण्यात आली आहे. जनकल्याण कक्षा बाबत विविध योजना घोषित केल्या जातील यासाठी सर्व नागरिकांनी शासकीय कार्यालयामध्ये येणे अत्यंत गरजेचे आहे. येथे येऊन विविध योजनांची माहिती घ्यावी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज जमा करावा आणि योजनेचा लाभ घ्यावा.

संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यालय विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावीत. जेणेकरून नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जाता येईल.

कित्येकदा विविध लोकांना शासनाच्या माध्यमातून प्रदान केलेल्या योजनाची माहिती व्यवस्थित रित्या मिळत नसते. माहिती नसल्यामुळे गरजू व्यक्तींपर्यंत या योजना अजिबात पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे या योजनेचा उद्देश देखील पूर्ण होत नाही.

यावर महत्त्वाचा पर्याय म्हणून चाळीसगाव, मुरबाड, जामनेर, कल्याण इत्यादी ठिकाणी शासकीय योजनांविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी नवीन अभिनव प्रदर्शन उपक्रम राबविण्यात येईल. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून एकाच जागेवर सर्व नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. आता संपूर्ण राज्यभरामध्ये राबविण्यात येईल.

ह्या अभियानामध्ये सर्व नागरिकांना शासकीय योजनांविषयी माहिती घेण्यासाठी संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन माहिती घ्यावी व विविध दस्तावेज त्या ठिकाणी उपलब्ध करावेत आणि अर्ज सोबत सबमिट करून विविध योजनांचा लाभ घ्यावा.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 75000 लाभार्थी यांना थेट लाभ घेण्याच्या उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. लाभार्थी व्यक्तींना लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर किंवा तालुका स्तरावर दोन दिवसाच्या महत्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल.

Leave a Comment