राज्य शासन सेवेतील संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रित या पदावर तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेली पदोन्नती नियमित करण्याबाबत राज्य शासनांच्या नियोजन विभागांकडून दि.14 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
अर्थ व सांख्यिकी संचालनाच्या आस्थापनेवरील सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रित या पदावर सदर वरील नमुद शासन निर्णयानुसार तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेली पदोन्नती नियमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .
यानुसार सदर शासन निर्णयानुसार राज्यातील एकुण 23 सहाययक संशोधन अधिकारी यांना संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रित या पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात आली होती . महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 03.04.2023 च्या पत्राद्वारे संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रित या पदाच्या सन 2015 च्या निवडसूचीत पदोन्नीस पात्र अधिकाऱ्यांचा नावांचा समावेश करण्याच्या शासन प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहेत .
यामध्ये एकुण अर्थ व सांख्यिकी संचालनायाच्या आस्थापनेवरील संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रित या पदाचा सन 2015 च्या निवडसुचीतील शासन निर्णयांमध्ये नमुद 17 अधिकाऱ्यांचा समावेश करण्यास आयोगाची सहमती असल्याने सदर कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी पदोन्नती मिळालेली आहे .
यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि.03.04.2023 च्या पत्राद्वारे मान्यता विचारात घेता संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रित या पदावरील तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेली पदोन्नती नियमित करण्यात येत आहेत .
नियमित पदोन्नती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नावे व या संदर्भातील नियोजन विभागाकडून दि.17.04.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करावे .
- Gold Price Today : खुशखबर ! सोने चांदीचे दर आता पुन्हा घसरले; दहा ग्राम सोन्याच्या नवीन दर पहा !
- आत्ताची मोठी बातमी , देशात पुन्हा एकदा नोटबंदी ! या तारखेपर्यंत नोटा बँकेत जमा करता येणार !
- Breaking News : आता राज्यातील नागरिकांना धान्या ऐवजी मिळणार पैसे , प्रतिव्यक्ती ऐवढे मिळणार पैसे !
- Property : पित्याने मुलांच्या नावावर संपत्ती केली असल्यास , मुलगी पित्याच्या संपत्तीवर न्यायालयात दावा करु शकते का ? कायदा काय सांगतो पाहा !
- Employee : सरकारी कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व सेवानिवृत्तीचा 50/55 वर्षे अथवा 30 वर्षे सेवानियम लागु होणार ,कडक कारवाईचे आदेश !