मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) तसेच शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची खुशखबर समोर आलेली आहे . नुकतेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नरेंद्र मोदींनी डी.ए मध्ये जानेवारी 2023 पासून वाढ लागु करुन मोठी भेट दिली आहे .
याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्तामध्ये ( DA ) मध्ये वाढ करणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मोठी आनंदाची खुशखबर दिलेली आहे .केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये आणखीण चार टक्के वाढ करणेबाबतच्या प्रस्तावाला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे . सदरचा वाढीव 4 टक्के डी.ए हा राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे माहे जानेवारी 2023 पासून लागु करण्यात येणार आहे .
त्याचबरोबर केंद्र सरकार प्रमाणे माहे जानेवारी 2023 पासून डी.ए फरकाची रक्कम देखिल अदा करण्यात येणार आहे .मिडीया रिपोर्टनुसार राज्य कर्मचाऱ्यांना माहे मे महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत वाढीव डी.ए चा लाभ अदा करणेबाबत अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार होता . परंतु राज्य शासनांकडुन डी.ए वाढीच्या प्रस्तावास विलंब झाल्याने , सदरचा प्रस्ताव प्रलंबित पडला होता .
हे पण वाचा : पेन्शनसाठी आता जागतिक पातळीवर हिसंक संघर्ष सुरू !
परंतु आता राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावास हिरवा कंदील देण्यात आला आहे .सदरचा वाढीव महागाई भत्ता हा राज्य कर्मचाऱ्यांना पुढीच्या म्हणजेच माहे जून महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत लागु करण्याची मोठी शक्यता समोर आली आहे .कारण जुलै महिन्यांपासून परत डी.ए वाढ करण्यात येत असते , यामुळे जुन महिन्याच्या देयकासोबत वाढीव डी.ए लागु करण्यासाठी वित्त विभागांडून प्रक्रिया सुरु करण्यात येत आहेत .
शिवाय विविध कर्मचारी संघटनांकडून डी.ए वाढीसाठी राज्य शासनांवर दबाव टाकण्यात येत असल्याने , पुढीच्या महिन्यांत राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराप्रमाणे डी.ए वाढीसह / डी.ए फरकाचा मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .
शासकीय कर्मचारी , नोकर पदभरती , राजकीय ,सांस्कृतिक तसेच चालु घडामोडींच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !