मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : सध्या भारतांमध्येच नव्हे तर जागतिक पातळीवर पेन्शनचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषयत ठरला आहे . भारतांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करुन नविन पेन्शन योजना अंमलात आणल्याने , देशातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून आंदोलने करण्यात येत आहेत . नुकतेच दि.14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता मोठे आंदोलने झाले .
आता पेन्शनचा मुद्दा हा जागतिक पातळीचा विषय ठरला आहे , सध्या फ्रान्स देशांमध्ये नागरिक तसेच कामगार पेन्शनच्या मुद्द्यांवर अधिकच आक्रमक झाले असून , सरकार विरुद्ध हिंसक वळ आंदोलकांनी घेतले आहेत . फ्रान्स देशांमध्ये सरकारी कर्मचारी , नागरिक यांना सेवानिवृत्तीनंतर वेगवेगळ्या प्रकारानुसार पेन्शन सरकारकडून देण्यात येते . फ्रान्स सरकारने नागरिकांचे जनमत न घेताच काही पेन्शन योजना बंद केल्याने नागरिक व कामगार अधिक आक्रमक झालेले आहेत .
फ्रान्स सरकारने दि.16 मार्च 2023 मध्ये एक पेन्शन विषयीचा कायदा अस्तित्वात आणून सेवानिवृत्तीचे वय 62 वरुन वाढवून 64 वर्षे करण्यात आले तर पेन्शनचा लाभ मिळविण्यासाठी किमान 43 वर्षे सेवा द्यावी लागणार असल्याचा कायदा करण्यात आलेला आहे .शिवाय पेन्शनमध्ये अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत .
फ्रान्स देशांमध्ये पेन्शनच्या एकुण 42 योजना सरकारने बंद केल्या व केवळ तीनच योजना सुरु ठेवल्याने , कामगार व नागरिकांनी आक्रमक भुमिका घेतली आहे .या आंदोलनांमध्ये आत्तापर्यंत 250 पेक्षा अधिक पोलिस / सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत , तर 200 पेक्षा आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत .
शासकीय कर्मचारी , नोकर पदभरती , राजकीय ,सांस्कृतिक तसेच चालु घडामोडींच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !