@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee sudharit shasan nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 02 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 02 ऑगस्ट 2024 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वैद्यकी खर्च प्रतिपुर्तीकरीता विवाहीत असणाऱ्या महिला शासकीय कर्मचाऱ्यास तिच्यावर पुर्णपणे अवलंबून असलेल्या व तिच्या बरोबर राहत असणाऱ्या तिच्या आई – वडिलांची अथवा तिच्या सासू – सासऱ्यांची निवड करणेबाबत , दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय अधिक्रमित करुन पुढीलप्रमाणे सुधारित आदेश देण्यात येत आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , महिला शासकीय कर्मचाऱ्यांने विवाहानंतर तिच्यावर पुर्णपणे अवलंबून असणाऱ्या व तिच्या बरोबर राहत असलेल्या आई – वडील अथवा सासू – सासरे या दोघांपैकी एकाच्या ( यांमध्ये आई – वडील अथवा सासू – सासरे यांच्या नावासह ) वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यासाठी निवड केली आहे , असे लेखी अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखास कळविणे बंधनकारक असणार आहे .
सदरच्या अर्जासोबत संबंधित विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई – वडील अथवा सासु – सासरे हे पुर्णपणे तिच्यावर अवलंबून आहेत , याबाबतचा सबळ पुरावा देणे आवश्यक असणार आहेत , याकरीता रेशनकार्डाची प्रत , नोंदणीकृत शपथपत्र इ. प्रमाण ठरविण्यात येईल .
तसेच संबंधित विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याचा वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्याकरीता आई – वडील अथवा सासू – सासरे या पैकी एकाच्या अवलंबित्वासह विकल्पाबाबतचा अर्ज प्राप्त झाल्याच्यानंतर संबंधित कार्यालय प्रमुखाने सर्व संबंधित कागदपत्रांची खातरजमा करुन संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या सदर विकल्पाची नावासह , दिनांकासह सेवापुस्तकामध्ये 08 दिवसात नोंद घेणे आवश्यक असणार आहेत .
त्याचबरोबर सदरचा शासन निर्णय हा यापुर्वी विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीच्या निर्णय घेण्यात आलेल्या प्रकरणांत लागु राहणार नाही अथवा निर्णित ठरलेल्या प्रकरणी पुन्हा सुरु करण्यात येणार नाहीत , असे नमुद करण्यात आले आहेत .
याबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- काल्पनिक वेतनवाढ कोटाच्या निर्देशानुसार लाभ देणेबाबत GR – वित्त विभाग ..
- Budget 2026 : अर्थसंकल्पातुन कर्मचाऱ्यांना काय मिळाले ? जाणून घ्या सविस्तर ..
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित दि.02.02.2026
- NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट ; या प्रकरणी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश !
- 07 तारखेला टीईटी परीक्षा व मतदान एकाच दिवशी आल्याने , पुन्हा निवडणुक तारखेत / TET परीक्षा तारखेत बदल!