Marathipepar प्रणित पवार प्रतिनिधी [State Veatan Sudharana samiti Shasan Nirnay ] : राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या अहवाल खंड – 2 मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतनस्तरविषयक वेतननिश्चिती संबंधी स्पष्टीकरण संदर्भात राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 30.04.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य वेतन सुधारणा समिती , 2017 च्या अहवालातील वेतनश्रेणीविषयक शिफारशींची व त्यावर शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबतचे आदेश शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 13.02.2023 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत . यांमध्ये राज्य वेतन सुधारणा समितीने केलेल्या शिफारशी शासनाने मान्य करुन एकुण 104 संवर्गांना सुधारित वेतनस्तर मंजूर केलेले आहेत .
त्या अनुषंगाने राज्य शासनांच्या ग्रामविकास विभाग अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदांमधील लघुलेखक ( उच्चश्रेणी ) , लघुलेखक ( निम्नश्रेणी ) व विस्तार अधिकारी या संवर्गांना वित्त विभागाच्या दिनांक 13.02.2024 रोजीच्या शासन निर्णयामधील सुधारित वेतनश्रेण्यांविषयक व अनुषंगिक शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत .
तर वित्त विभागाच्या दिनांक 22.02.2023 रोजीच्या परिपत्रकानुसार , वित्त विभागांकडून सदर स्पष्टीकरणात्मक सुचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील लघुलेखक ( उच्चश्रेणी ) , लघुलेखक ( निम्नश्रेणी ) व विस्तार अधिकारी या संवर्गांना लागु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे , त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे परिपत्रक प्रसृत करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधि.1961 मधील कलम 248 च्या परिपत्रकानुसार अनुज्ञेय असलेल्या अधिकारानुसार वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 22.02.2024 नुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषंदामधील लघुलेखक ( उच्चश्रेणी ) , लघुलेखक ( निम्नश्रेणी ) व विस्तार अधिकारी या संवर्गांना योग्य त्या फेरफारांसह लागु करण्यात येत आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या ग्राम विकास विभांगाकडून दिनांक 30.04.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय ( GR ) पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025