आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी अपडेट ; लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ The latest major update regarding the Eighth Pay Commission  ] : आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत असून , याबाबत संसदेत दोन सदस्यांनी विविध प्रश्न अर्थमंत्र्याला विचारण्यात आले होते , सदर प्रश्नाला अर्थमंत्र्यांकडून उत्तर देण्यात आले आहेत .

दिनांक 17 मार्च 2025 रोजी लोकसभेत सदस्य कंगना राणौत व साजदा अहमद यांनी तारांकित प्रश्न क्र.235 नुसार कर्मचाऱ्यांच्या आठवा वेतन आयोगाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते . याबाबतचे प्रश्न व उत्तर पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

a)केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगार व पेन्शनच्या सुधारणेसाठी सरकारने आठवा केंद्रीय वेतन आयोग ( सीपीसी ) स्थापन केला आहे का ? सदर प्रश्नाला अनुसरुन उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सितारण यांनी नमुद केले कि , सरकारने आठवा केंद्रीय वेतन आयोग ( सीपीसी ) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे .

b)तसे असल्यास , आयोगाच्या संदर्भातील अटी व पेन्शनच्या सुधारणेसाठी सरकारने आठवा वेतन केंद्रीय वेतन आयोग ( सीपीसी ) स्थापन केला आहे का ? यावर उत्तर देताना निर्मला सितारण यांनी सांगितले कि , योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे नमुद करण्यात आले .

c)सातवा सीपीसी स्तरावरील केंद्र सरकारचे कर्मचारी व पेन्शन धारकांची अंदाजे संख्या आठव्या वेतन आयोग सीपीसी द्वारे लाभ मिळण्याची शक्यता आहे , ज्यामुळे ओडिशासह देशभरात उपभोग वाढे व आर्थिक वाढ होईल . उत्तर – यावर उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी नमुद केले कि , केंद्र सरकारच्या नागरी कर्मचारी..

 व पेन्शन धारक / कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांची अंदाजे संख्या अनुक्रमे 36.57 लाख ( दिनांक 01.03.2025 रोजी ) तर 33.91 लाख ( दि.31.12.2024 रोजी ) आहे . संरक्षण कर्मचारी व पेन्शन धारकांनाही याचा लाभ होणार आहे असे नमुद करण्यात आले आहेत .

हे पण वाचा : वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !

d) आठवा वेतन आयोग सीपीसी च्या शिफारशींच्या अंमलबजावणीमुळे सरकारवरील आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे का ? e) असल्यास त्याचा तपशिल – d & e )  उत्तर – सदर प्रश्नांच्या अनुषंगाने उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी नमुद केले कि , आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींचा आर्थिक परिणाम कळेल , एकदा आठव्या केंद्रीय वेतन आयोगाने शिफारशी केल्या व सरकारने स्विकारल्या तेंव्हा या सर्व बाबी स्पष्ट होतील असे नमुद करण्यात आले आहे .

‍f) आठवा सीपीचा राजकोषीय धोरण व सरकारी खर्चावरील परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी सरकारने कोणताही अभ्यास केला आहे किंवा कर्मचारी संघटना , पेन्शन धारक व इतर भागधारकांशी सल्लामसलत केले आहे का ? उत्तर – प्रमुख भागधारकांकडून संदर्भ अटींवरील इनपुट्स मागविण्यात आले आहेत , संरक्षण मंत्रालय , गृह विभाग , कार्मिक व प्रशिक्षण विभाग व राज्यांकडून आठवा सीपीसीच्या शिफारशी आठव्या सीपीसीने केल्या व सरकारने स्वीकारल्या तरच आठव्या सीपीसीच्या प्रभावाने मूल्यांकन केले जावू शकते असे नमुद करण्यात आले आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment