@marathipepar चंदना पवार प्रतिनिधी [ Under this scheme of the state government, degree holders will get a monthly stipend of Rs. 61,500/-; GR issued on 03.04.2025] : मुख्यमंत्री फेलोशीप कार्यक्रम अंतर्गत फेलोंची निवड करण्याचे निकष , अटी व शर्ती आणि कार्यक्रम अंमलबजावणी बाबत नियोजन विभागाकडून दिनांक 03 एप्रिल 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात आला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेली आहे की , मुख्यमंत्री फिलोशीप कार्यक्रम 2025-26 करिता फेलोंची निवड संदर्भातील निकष फेलोंची नियुक्ती या संदर्भात अटी व शर्ती त्याचबरोबर शैक्षणिक संस्थामार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणी बाबत कार्यवाही करण्याचे निर्देश सदर शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहे .
फेलोंची निवड संदर्भातील निकष : प्रथमतः फेलो हा भारताचा नागरिक असणे आवश्यक असेल , शैक्षणिक पात्रता मध्ये कोणत्याही शाखेतील किमान 60 टक्के गुण घेऊन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
अनुभव : किमान एक वर्ष पूर्णवेळ कामाचा अनुभव यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता अप्रेंटिसशिप / इंटर्नशिप / आर्टिकलशिपसह 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक राहील . याबाबत अर्जदारास स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहेत .
संगणक व भाषा ज्ञान : अर्जदारास मराठी भाषा वाचता, लिहिता व बोलता येणे आवश्यक असेल , याशिवाय इंग्रजी व हिंदी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील . या शिवाय संगणक हाताळणे व इंटरनेटचे ज्ञान आवश्यक असेल .
वयोमर्यादा (Age limit) : अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेस उमेदवारांचे किमान वय 21 वर्ष तर कमाल वय 26 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असेल .
निवड करण्याची कार्यपद्धती : फेलोशिप करिता उमेदवारांची ऑनलाइन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा घेण्यात येईल , सदर परीक्षांच्या गुणाच्या आधारे 210 उमेदवारांची निबंध लेखन घेण्यात येईल , याशिवाय मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबवण्यात येईल .
मिळणारे विद्यावेतन : सदर कार्यक्रम अंतर्गत निवड झालेल्या फेलोना दरमहा 56,100/- +5400 असे एकूण 61500 /- रुपये विद्या वेतन मिळेल ..
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता Click Here
- राज्यातील “या” जिल्ह्यांना पुढील 24 तासात अवकाळी पावसाचा अलर्ट जारी !
- राज्य सरकारच्या ‘या” योजनेअंतर्गत पदवीधारकांना मिळणार दरमहा 61,500/- विद्यावेतन ; GR निर्गमित दि.03.04.2025
- दिनांक 03 , 04 व 05 एप्रिल रोजी राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा : जाणून घ्या हवामान अंदाज !
- माहे मार्च 2025 चे वेतन देयक संदर्भातील महत्वपुर्ण सुचना ; अधिक्षक वेतन व भ.नि.निधी पथक परिपत्रक दि.01.04.2025
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडीयाच्या वापरावर कात्री ; नविन नियमावली !