@marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Unseasonal rain alert issued for “these” districts of the state in the next 24 hours ] सध्या राज्यामध्ये उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने , बऱ्याच भागात अवकाळी पाऊस पडत आहे . भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे .
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , पुढील 24 तासांमध्ये राज्यातील परभणी , बुलढाणा, अकोला, नागपूर , जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . यामुळे सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे अशा सूचना देण्यात आले आहेत .
तर रायगड , ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाची सरी पडू शकतील असा इशारा देण्यात आलेला आहे . दरम्यानच्या काळात राज्यातील सरासरी तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे .
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , मराठवाड्यामध्ये परभणी , जालना , बीड या भागात पावसाचा अधिक जोर राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . तर विदर्भामध्ये विजेच्या कडकडाटसह गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर पुढील काळात मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह विजेचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . सदर काळामध्ये शेतकऱ्यांनी आपली स्वतःची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आली आहे .
- राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी ( कनिष्ठ लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक ) पदे भरणेबाबत परिपत्रक दि.28.05.2025
- Old Pension : शासन निर्णयांमध्ये सुधारण करुन जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , मुख्यमत्र्यांना पत्र सादर .
- Post Office Best Scheme | पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना ! 1000/- रुपये ,गुंतवणुकीवर मिळवा तीन लाखांचा परतावा !
- राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीचे प्रसंग – म.नागरी ( वेतन ) नियम ; जाणून घ्या सविस्तर ..
- भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कराची , लाहोर शहरापर्यंत आत घुसले ; तर बलुचिस्तान मध्ये BLA ताबा ..