@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Very important information (understanding) for state officers/employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्वपुर्ण सुचना ( समज ) देण्याबाबत महसुल व वनविभाग मार्फत दि.23 जुन 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , अधिकारी अथवा कर्मचारी हे सरकारी कार्यालयांमध्ये व कार्यालयीन वेळामध्ये आपले वैयक्तिक समारंभ जसे वाढदिवस साजरा करत असल्याची बाब निदर्शनास आलेले आहेत .
यामुळे कार्यालयीन कामाचा वेळ वाया जाते , परिणामी कामानिमित्त आलेल्या अभ्यागत , नागरिक यांना त्यांच्या कामाकरीता तिष्ठता रहावे लागते , अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करण्याची बाब ही चुकीची असून , म.ना.सेवा नियम 1979 नुसाच उचित नाही .
यामुळे यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ सरकारी कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या वेळात साजरे केल्याचे आढळून आल्यास , संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल .
हे पण वाचा : 15,000+ राज्य / केंद्र सरकारी नोकर भरती जाहिराती .. पाहा सविस्तर ..
तसेच यापुर्वी यापुर्वी अशा प्रकारचे समारंभ साजरे केलेले असल्यास , अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांना समज देण्याचे निर्देश देण्यात आले आहे . व यापुढे अशा प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नसल्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !