राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना केंद्राप्रमाणे वाढीव 3% ( 58% प्रमाणे ) डी.ए चा लाभ जानेवारी वेतन / पेन्शन देयकासोबत ..

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Increased 3% (as 58%) DA benefit along with January salary/pension payment.. ] : राज्य सरकारी / निमसरकारी ( जिल्हा परिषद ) तसेच इतर पात्र कर्मचारी व पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3 टक्के महागाई भत्ताचा लाभ हा जानेवारी वेतन देयकासोबत मिळेल ..

सध्या राज्यांमध्ये निवडणुकांच्या आचारसंहिता सुरु आहेत . सध्या नुकतेच राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रम पुर्ण झाले असुन , पुढील महिन्यांत महानगरपालिकांचे निवडणुक कार्यक्रम जानेवारी महिन्यांच्या 20 जानेवारी पर्यंत राहणार आहे .

यामुळे डी.ए वाढीबाबतचा अधिकृत्त निर्णय हा जानेवारी अखेरच निर्गमित होईल , व जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन / पेन्शन देयकासोबतच डी.ए वाढ लागु होईल . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीकरीता प्रतिक्षा करावी लागणार आहे .

01 जुलै 2025 पासुन वाढीव डी.ए व थकबाकी : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक 01.07.2025 पासुन वाढीव 03 टक्के महागाई भत्ता व महागाई भत्ता फरक मिळणार आहे .

डी.ए वाढीबाबत राज्यातील वर्ग – 4 कर्मचारी संघटना मार्फत राज्य सरकारला निवेदन पत्र सादर करण्यात आले आहेत . यामुळे राज्य सरकार मार्फत देखिल डी.ए वाढीच्या प्रस्तावाला निवडणुक कार्यक्रम पुर्ण झाल्यानंतर मंजूरी दिली जाणार आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment