मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : राज्य शासनांकडून विद्यार्थ्यांना अधिक गुणसंपन्न करण्यासाठी राज्य शासनांच्या शालेय शिक्षण विभागांकडून नविन शैक्षणिक धोरणांवर अवलंबून नविन शैक्षणिक नियमावली तयार करण्यात येत आहेत . यानुसार अनेक नविन नियम लागु करण्यात येत आहेत , यांमध्येच राज्यातील शाळांच्या वेळांमध्ये देखिल बदल करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला आहे .
सदरचे वेळापत्रक हे राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत आश्रमशाळांसाठी लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे , या सुधारित वेळापत्रकानुसार आश्रमशाळा ह्या निवासी कार्यरत असल्याने , त्यानुसार वैळापत्रकांमध्ये बदल करण्यात आले आहेत .यापुर्वी आश्रमशाळा / राज्यातील सर्वच शाळा ह्या सकाळी 11 वाजता सुरु होवून संध्याकाळी 5 वाजता सुटत होत्या .
परंतु आता सुधारित वेळापत्रकानुसार आश्रमशाळा ह्या सकाळी 7.50 वाजेपासून सुरुवात होणार आहे . तर सायंकाळी 6.30 पर्यंत शाळेसह विविध उपक्रम / कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे .यांमध्ये सकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांना अधिक्षक / अधिक्षिका यांच्याकडून उठविण्यात येतील . त्यानंतर सकाळी 7.50 वाजता प्रार्थना होईल , त्यांनतर 8.20 मिनिटाला शाळेचा पहिला तास सुरुवात होईल त्यांनतर 10.15 वाजता छोटी सुट्टी देण्यात येईल .
हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करणेबाबत वित्त विभागाकडून अधिसूचना !
तर 12.20 मिनिटाला दुपारच्या जेवनासाठी सुट्टी होईल , त्यानंतर 1.35 मिनिटे ते 3.25 मिनिटे या कालावधीत तासिका होतील. त्यानंतर 3.25 मिनिटाला राष्ट्रीय गीत होईल , त्यानंतर 3.30 ते 4.15 मिनिटे मोकळा वेळ असणार आहे , त्यानंतर खेळासाठी 4.15 ते 5.30 हा वेळ असेल .त्यानंतर 5.30 ते 6.30 या संध्याकाळचा कालावधी हा स्पर्घेची तयारी , अतिरिक्त तासिक ,वाचनालयाची वेळ याकरीता असणार आहे .त्यांनतर 6.30 ते 7.30 या वेळेत रात्रीचे जेवन व त्यानंतर 7.30 ते 9.00 या कालावधीत स्वयं अध्ययनाची वेळा असणार आहे .
शासन निर्णय , शासकीय कर्मचारी , नोकरी अपडेट , राजकिय , सांस्कृतिक बातम्यांच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .