Breaking News : अखेर राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ लागु करण्यासाठी तात्काळ बैठकीचे आयोजन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे गठित समितीबरोबर चर्चेसाठी उपस्थित राहणेबाबत श्री. विश्वास काटकर सरचिटणीस तथा निमंत्रक सरकारी -निमसरकारी , शिक्षक – शिक्षकेत्तर , महानगरपालिका , नगरपालिका , नगरपरिषद , नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांना निमंत्रत करण्यात आले आहेत .

या संदर्भात राज्य शासनांच्या संचालनालय लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य विभागांकडून दि.04 मे 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . यामध्ये नमुद करण्यात आले आहे कि , राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .

 प्रस्तुत समितीस दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाय योजना शिफारस / अहवाल शासनास सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत .

हे पण वाचा : आता सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही मिळणार मानधन तत्वावर नोकरी !

यानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरीता दिनांक 21.04.2023 रोजी समितीची यापुर्वीच बैठक पार पडली असून सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार श्री.विश्वास काटकर यांना अधिकची माहिती द्यावयाची असल्याने पुन्हा एकदा निमंत्रित करण्यात येत आहे .

हे पण वाचा :New Pay Commission : कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लवकरच लागु होणार , पगारात होणार इतकी मोठी वाढ !

यासाठीची बैठक दिनांक 09 मे 2023 मंगळवार रोजी 6.00 वाजता सातवा मजला मुख्य इमारत मंत्रालय येथे आयोजित करण्यात आली असून सदर बैठकीस निमंत्रक विश्वास काटकर यांना उपस्थित राहण्याची विनंती सदर परिपत्रकान्वये करण्यात आली आहे .

सरकारी / निमसरकारी , पेन्शनधारक कर्मचारी विषयक , योजना , तसेच राजकिय / आर्थिक घडामोंडीच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .

Leave a Comment