प्रशासनाने आपल्या किशोरवयातील मुलींना शारीरिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या, यासोबतच मानसिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्याने किशोरी शक्ती योजना राबवली आहे. ही योजना राबवण्याचा उद्देश हाच आहे की, स्त्रियांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक शक्तीचा विकास व्हावा. या योजनेच्या माध्यमातून 11 ते 18 वयोगटातील मुली लाभ घेऊ शकतील.
ग्रामीण भागातील व शहरी भागातील अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून याची सर्व प्रशिक्षण दिले जाईल. चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मुलींच्या हितासाठी राबवलेल्या या योजनेबद्दल सविस्तर माहिती. योजनेचा लाभ घेऊन मुलींचा विकास कशाप्रकारे होईल. यासोबतच योजने संबंधित प्रत्येक अपडेट आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेऊया.
आपल्या राज्यांमध्ये ज्या मुली दारिद्र्यरेषेखाली कुटुंबात मोडत आहेत. यासोबतच त्या कुटुंबातील मुली किशोरवयीन वयोगटात आहेत. अशा सर्व मुलींना प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून 11 ते 18 वयोगटातील सर्व मुलींना लाभ घेता येणार असून ज्या मुलींनी शाळा व शिक्षण सोडले आहे.
योजनेच्या माध्यमातून ज्या मुली किशोरवयीन वयोगटात आहेत त्यांना सामाजिक, मानसिक, शारीरिक दृष्ट्या प्रबळ करण्यासाठी प्रशासनाने योजना राबवली आहे. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक अशा किशोरवयीन मुलीसाठी तब्बल एक लाख रुपये खर्च केले जाणार असून या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण कामकाज पाहण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत हे कामकाज पार पाडले जाईल.
प्रशासन महाराष्ट्र किशोरीशक्ती योजनेच्या माध्यमातून सर्व गरीब मुलींना मानसिक दृष्ट्या शारीरिक सुदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी जेणेकरून त्या मुली स्वतःचा आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा चांगल्या प्रकारे विकास करू शकतील आणि आपल्या देशभराच्या विकासाला चांगला हातभार लावू शकतील यासोबतच या योजनेच्या माध्यमातून तर राज्यातील सरकारला सुद्धा हे आव्हान केले आहे. की तुम्ही सुद्धा तुमच्या राज्यांमध्ये ही योजना राबवावी जेणेकरून भारत देशातील संपूर्ण किशोरवयीन मुलींना सक्षम बनवता येईल.
या योजनेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी व लाभ घेण्यासाठी प्रशासनाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळावर जावे…
अधिकृत संकेतस्थळ https://womenchild.maharashtra.gov.in/