प्रशासनांमध्ये अनुभवी व तज्ञ लोकांचे सरकारी कामकाजांमध्ये हातभार लागावा याकरीता सेवानिवृत्तीचे वय वाढविणे चुकीचे आहे . स्पर्धा परीक्षा देवून अनेक उमेदवार वयाच्या 22-25 वर्षांमध्येच कलेक्टर पदी निवडून येतात , यामुळे अनुभवाचा निकष लावाणे चुकीचे असून सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे न करता उलट सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 50 वर्षे करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केले आहे .
राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासंदर्भात सकारात्मक भुमिका मांडली आहे . यास विरोध दर्शविणारे पत्र कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केले आहे .कुलकर्णी यांचे म्हणणे आहे कि , दरवर्षी शासन सेवेतुन 3 टक्के कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात , म्हणजेच सुमारे 48,000 हजार नोकऱ्या दरवर्षी निमार्ण होत असतात .जर सेवानिवृत्तीचे वय वाढविल्यास ह्या नोकऱ्या निर्माण होणार नाहीत .
त्याचबरोबर यावेळी त्यांनी नमुद केले आहे कि , केवळ मंत्रालयातील राजपत्रित अधिकाऱ्यांची प्रमोशनसाठी निवृत्तीचे वय वाढविण्याची धडपड आहे , या निर्णयाला मंत्रालयाबाहेरील कर्मचाऱ्यांचा विरोध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे .तसेच महाराष्ट राज्याचा बेकारीचा दर हा 16.5 टक्के असून , सेवायोजन कार्यालयांमध्ये नोंदविण्यात आलेल्या सुशिक्षित बेकारांची संख्या ही 58 लाखावर आहे .
राज्यांमध्ये बेकारी मोठ्या प्रमाणात असल्याने , रिक्त पदांवर तात्काळ पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली पाहिजे .तर सरकारी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 25 वर्षे नोकरी द्यायला हवी , तर सेवानिवृत्तीचे वय पन्नास वर्षे करण्यात यावी .अशी मागणी करणारे पत्र सामाजिक कार्यकर्ते श्री.हेरंब कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना सादर केले आहे .