Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Pramotion Committee shasan Nirnay ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणेसंदर्भात विभागीय पदोन्नती समिती गठित करणे संदर्भात राज्य शासनांच्या दिव्यांग कल्याण विभागांकडून दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासन सेवा मध्ये पदोन्नतीकरीता पात्र असणाऱ्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना पदोन्नती देणे करीता अनुसरावयाच्या कार्यवाहीबाबतची एकत्रित मागदर्शक तत्वे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 01.08.2019 रोजीच्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर निर्णयानुसार बिगर मंत्रालयीन संवर्गामधील आस्थापना मंडळाच्या कार्यकक्षेत नसणाऱ्या गट अ ते गट ड मधील सर्व पदांवर पदोन्नतीकरीता संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे प्रधान सचिव / सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पदोन्नती समितीची तरतुद करण्यात आलेली आहे , त्यानुसार विभागीय पदोन्नती समितीचे गठन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .
दिव्यांग कल्याण विभागाच्या दिनांक 29.04.2024 रोजीच्या निर्णयानुसार , सामान्य प्रशासन विभागच्या दिनांक 01.08.2019 रोजीच्या दिलेल्या सुचनांनुसार दिव्यांग कल्याण विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांसाठी 6 व्या वेतन आयोग नुसार ज्या पदांचे ग्रेड वेतन रुपये 7599/- रुपये अथवा त्यापेक्षा कमी आहे , अशा सर्व पदांकरीता तसेच आस्थापना मंडळाच्या कार्यकक्षेत नसणाऱ्या गट अ ते गट ड मधील सर्व पदांवर पदोन्नतीकरीता प्रधान सचिव / सचिव , दिव्यांग कल्याण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पदोन्नती समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : मतदान करताना सरकारी कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन , नवा वेतन आयोग करीता मतदान !
यांमध्ये पदोन्नतीची शिफारस करण्याकरीता प्रस्ताव विचारात घेणे व सेवा प्रवेश नियमानुसार तरतूदीनुसार व सा.प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश / मार्गदर्शक सूचना विचारात घेवून पदोन्नतीसाठी पात्र अधिकाऱ्यांची निवडसूची तयार करुन नियुक्ती प्राधिकाऱ्यास पदोन्नतीसाठी शिफारस करण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत .
तसेच मानिव दिनांकाचे प्रस्ताव विचारात घेणे व सेवा प्रवेश नियमांचे तरतुदीनुसार सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश / मार्गदर्शक सूचना विचारात घेवून पदोन्नतीचा मानीव दिनांक देण्याकरीता नियुक्ती प्राधिकाऱ्यास शिफारस करण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या दिव्यांग कल्याण विभाग मार्फत दिनांक 29.04.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

- Post Office Best Scheme | पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना ! 1000/- रुपये ,गुंतवणुकीवर मिळवा तीन लाखांचा परतावा !
- राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीचे प्रसंग – म.नागरी ( वेतन ) नियम ; जाणून घ्या सविस्तर ..
- भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कराची , लाहोर शहरापर्यंत आत घुसले ; तर बलुचिस्तान मध्ये BLA ताबा ..
- या दिवशी लागणार इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- कर्मचाऱ्यांचे सेवेचे 18 वर्षे पुर्ण झाल्यानंतर करावे लागणार हे काम ; सरकारचे महत्वपुर्ण निर्देश .