राज्य निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांच्या निवृत्तीवेतन / कुटंबनिवृत्ती वेतनांमध्ये वाढ करणे संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

Marathipepar प्रणित पवार प्रतिनिधी [ Pension & Family Pension Increase Shasan Nirnay ] : राज्य निवृत्तीवेतन धारक व कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांच्या निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्ती वेतनांमध्ये वाढ करणे संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 16.01.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण / GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार वय वर्षे 80 वर्षे व त्यावरील राज्यातील शासकीय निवृत्ती वेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना  7 व्या वेतन आयोग नुसार निश्चित करण्यात आलेल्या मूळ निवृत्ती वेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन ( Family Pension ) मध्ये वाढ लागु करणेबाबत दिनांक 01 जानेवारी 2019 पासून सुधारित करण्यात आला आहे . सदरच्या निर्णयानुसार वयांनुसार दिनांक 01.01.2024 पासून खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे .

अ.क्रनिवृत्तीवेतनधारकाचे नावमूळ निवृत्ती वेतन मधील वाढ
01.वय वर्षे 80-85मुळ निवृत्तीवेतनात 20 टक्के वाढ
02.वय वर्षे 85-90मुळ निवृत्तीवेतनांमध्ये 30 टक्के वाढ
03.वय वर्षे 90-95मुळ निवृत्तीवेतनांमध्ये 30 टक्के वाढ
04.वय वर्षे 95-100मुळ निवृत्तीवेतनांमध्ये 50 टक्के वाढ
05.वय वर्षे 100 पेक्षा अधिकमुळ निवृत्तीवेतनांमध्ये 100 टक्के वाढ

हे पण वाचा : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF Update) : पीएफ खात्यांमधील पैसे काढणेबाबत नियमांमध्ये बदल ; जाणून घ्या सविस्तर !

सदर सुधारित लाभ हा दिनांक 01 जानेवारी 2024 पासून देय आहे , तर वाढीव दरानुसार लाभ घेणाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची फरकाची रक्कम अनुज्ञेय होणार नाही . सदरचा निर्णय हा राज्यातील सर्व पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना लागु असणार आहे . या बाबतचा अधिकृत्त शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment