मतदान करताना सरकारी कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन , नवा वेतन आयोग करीता मतदान !

Spread the love

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Employee Vote For OPS & New Pension Scheme ] : देशातील केंद्रीय तसेच राज्य सरकारी कर्मचारी हे जुनी पेन्शन , नवा वेनत आयोग करीता मतदान करीत आहेत . तसेच यांमध्ये कर्मचारी सामाजिक जागृती मध्ये आपले कार्य व पेन्शनची हित लक्षात आणून देण्यात येत आहेत .

कारण देशांमध्ये राजकारणांची पेन्शन जुनी पेन्शन प्रमाणेच सुरु आहे , शिवाय राजकारणांच्या पेन्शन प्रस्ताव हा लगेचच पारीत करण्यात येतो , तर आयुष्यभर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन साठी अनेक वेळा रस्त्यावर आंदोलने करावे लागत आहेत . यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसून येत आहेत .

जुनी पेन्शनची मोठी मागणी : सरकारी कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी म्हणजे जुनी पेन्शन ही होय , नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने जुनी पेन्शन पेन्शन लागु करण्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे , परंतु त्याबाबत अधिकृत्त निर्णय अद्याप निर्गमित झालेला नाही . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये देखिल नाराजगी आहे , तर केंद्र सरकारकडून नवा वेतन आयोग लागु करणेबाबत समितीचे गठण करण्यात आलेले नाहीत ,

यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये देखिल मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसून येत आहेत .यामुळे कर्मचाऱ्यांना जो पक्ष जुनी पेन्शन , नवा वेतन आयोग लागु करण्यास सहमत आहे , अशा पक्षांस कर्मचाऱ्यांकडून मतदान करण्यात येत आहेत .

हे पण वाचा : मतदान कामकाज करणाऱ्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना सुट्टी देणेबाबत माहिती .

राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याची केवळ घोषणा करण्यात आलेली आहे , याबाबत अधिकृत्त शासन निर्णय हा विधानसभेच्या निवडणूका पुर्वी होण्याची शक्यता आहे . कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व नवा वेतन आयोग लागु करण्याच्या बाजुने असणाऱ्या ( ज्या पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये नमुद आहेत ) अशा पक्षांस मत देण्याचा कल असणार आहे .

Leave a Comment