अर्जित रजेच्या रोखीकरण संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.05.23.2026

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ An important circular regarding the encashment of earned leave was issued on May 23, 2026. ] : अर्जित रजा रोखीकरण संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दि.05.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , अशासकीय खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत विविध संघटनेकडून वारंवार विचारणा करण्यात येत असून , सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोल्हापुर यांचेकडून शासनास अहवाल पाठविणेबाबतचे निवेदन संचालनालयास प्राप्त झाले आहेत .

अशासकीय प्राथमिक / माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणासाठी शासनाचे निर्णय व नियमातील तरतुदी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

01.महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी 1981 मधील नियम 16 मधील नियमानुसार मोठ्या सुटीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाची भरपाई करण्याच्या प्रयोजनार्थ माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला दि.01.04.1981 पासुन सेवेच्या प्रत्येक पूर्ण वर्षाकरीता 15 दिवसाच्या अर्जित रजा अनुज्ञेय राहील .

मात्र ज्या दिवशी असल्यास पुर्वीची शिल्लक अर्जित रजा व मिळविलेली अर्जित रजा 300 दिवसाएवढी होईल त्या दिवशी मुख्याध्यापकाला अशी रजा मिळणे बंद होईल .

शालेय शिक्षण विभागाच्या दि.04.08.1995 रोजीच्या निर्णयानुसार खाजगी शाळातील दीर्घ सुट्टी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यांमध्ये शिक्षक वर्ग , मुख्याध्यापक , व प्रयोगशाळा सहाय्यक यांचा समावेश आहे . वीस दिवसांच्या अर्धपगारी रजेऐवढी दहा दिवसाची अर्जित रजा मंजूर करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच ही अर्जित रजा रोखीत वटवता येणार नाही अशी तरतुद करण्यात आलेली आहे .

तसेच महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी च्या प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना लागु असल्याची धारणा पक्की करण्यास विनंती करण्यात आलेली होती , शासनांच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

WhatsApp Group Join Now

Leave a Comment