Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Arjit Raja Rokhikaran Sudharit Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचे रोखीकरण हे सुधारित वेतन संरचना नुसार करणे बाबत राजय शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 04 मे 2022 रोजी सुधारित GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
वित्त विभागांकडून दिनांक 15 जानेवारी 2001 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची मर्यादा ही 240 दिवसांवरुन 300 दिवसांपर्यंत वाढविण्यात आलेली आहे . तर सदरची मर्यादा ही राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त ( Granted ) प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयामधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 09 एप्रिल 2001 नुसार लागु करण्यात आलेले आहेत .
तर दिनांक 01 जानेवारी 2016 पासुन सुधरित वेतन संरचना लागु करण्याबाबत ( सुधारित नियम 2018 ) अधिसूचित करण्यात आलेले असून , त्यानुसार खाजगी मान्यताप्राप्त शाळा , महाविद्यालयातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागु करण्यात आली आहे .
सदरच्या दिनांक 04 मे 2022 रोजीच्या GR नुसार , दिनांक 01.01.2016 रोजी अथवा त्याच्या नंतर शासन सेवेत असताना निधन झालेल्या / तसेच भविष्यात होणाऱ्या तसेच सेवानिवृत्त झालेले / होणारे खाजगी मान्यताप्राप्त शिक्षके / शिक्षकेत्तर कर्मचारी ज्यांना अर्जित रजा देय आहे , अशा कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरणासाठी वेतन या संज्ञेचा अर्थ हा मूळ वेतनाच्या ( वित्त विभागाच्या दिनांक 30.01.2019 ) मधील नियम क्र.3 ( 12) नुसार राहणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत.
तसेच अर्जित रजा देय असणाऱ्यांना सुधारित वेतन संरचना मधील वेतन विचारात घेवून त्यांना नियमाप्रमाणे अनुज्ञेय असणारे शिल्लक रजेचे ( अर्जित ) संबंधातील रजा वेतनाची सममुल्य रोख रक्कम , एका ठोक रकमेत रोखीने प्रदान करण्यात यावी , असे नमुद करण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील सविस्तर GR आपण पुढीलप्रमाणे पाहू शकता ..
- सोयाबीन , कापूस , तुरी ,मका लागवडीमध्ये 13 टक्क्यांनी घटले ; तर अतिवृष्टीमुळे उत्पादनांमध्ये घट , यामुळे यंदा बाजारभाव वाढणार !
- राज्यात पुढील 3 ते 4 दिवसांत पुन्हा पावसाचा जोर वाढणार ; जाणुन घ्या नविन अंदाज !
- सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणेबाबत , राज्य शासनांकडुन महत्वपुर्ण GR निर्गमित ; दि.14.08.2024
- शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत , शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन !
- शेतकऱ्यांना नवीन शेत जमीन खरेदी करण्यासाठी “या” बँकेकडून मिळत आहे , सुलभ कर्ज.