Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee DA & HRA Increase Update News ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे महागाई भत्ता वाढीसह , घरभाडे भत्ता मध्ये मोठी वाढ होणार आहे . घरभाडे भत्ता वाढीकरीता अपेक्षित डी.ए चे दर गाठले आहेत .
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासून 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेले आहेत , यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकुण 50 टक्के दराने महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे . घरभाडे वाढ मध्ये सुधारणा ही डी.ए दर 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , लागु होणार आहे . येत्या माहे जुलै 2024 पासुन परत डी.ए मध्ये वाढ होणार आहे .
यामुळे जुलै 2024 पासुन सरकारने डी.ए मध्ये 1 टक्के जरी वाढ लागु केली तरी देखिल , महागाई भत्ताचा आकडा हा 50 टक्के पार करेल , यामुळे घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा होईल . यापुर्वी महागाई भत्ता 0-24 टक्के असेपर्यंत घरभाडे भत्ताचे दर हे वास्तव्याच्या ठिकाणानुसार 8 टक्के , 16 टक्के , 24 टक्के इतका होता , ज्यावेळी डी.ए चे दर 25 टक्क्याचा आकडा पार केला , त्यावेळी घरभाडे भत्ता मध्ये अनुक्रमे 9 टक्के , 18 टक्के , 27 टक्के अशाी सुधारणा करण्यात आली .
आता महागाई भत्ता मध्ये जुलै 2024 पासून एकुण डी.ए 50 टक्केचा आकडा पार करेल , यामुळे घरभाडे भत्ता मध्ये अनुक्रमे 10 टक्के , 20 टक्के , 30 टक्के अशी सुधारणा करण्यात येईल . घरभाडे भत्ता वाढीनंतर वाहन भत्ता मध्ये देखिल वाढ लागु करण्यात येईल .
सरकारी कर्मचाऱ्यांना जुलैच्या डी.ए वाढीबरोबरच घरभाडे भत्ता मध्ये वाढ होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या एकुण वेतनाची मोठी वाढ होईल .
- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024