राज्यातील वेतनत्रुटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार , दि.01.01.2016 पासुन सुधारित वेतनश्रेणीचा लाभ !

Spread the love

Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Vetantruti Update ] : सातव्या वेतन आयोगानुसार ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत , अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करणेबाबत , राज्य शासनांकडून दिनांक 16.03.2024 रोजी वेतनत्रुटी निवारण समितीचे गठण करण्यात आलेले आहेत .

यांमध्ये ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये त्रुटी आहेत ,अशा पदांना सातव्या वेतन आयोग नुसार सुधारित वेतनश्रेणी लागु केली जाणार आहे ,  केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेच्या अनुषंगाने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 30 जानेवारी 2019 रोजीच्या शासन अधिसूचना नुसार , दिनांक 01 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतनश्रेणी विहीत करण्यात आलेली आहे .

यांमध्ये माननिय न्यायालयाच्या आदेशानुसार सातव्या वेतन आयोगामधील वेतन त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने तपासणी करुन शिफारशी करण्याकरीता वित्त विभाग , शासन निर्णय , दिनांक 16 मार्च 2024 नुसार वेतनत्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांने राजीनामा दिल्याच्या नंतर परत राजीनामा मागे घेणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय ( वित्त विभाग )

या समितीमध्ये राज्य शासनांचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली वेतनत्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .सदर समिती स्थापन झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांत आत सदर समितीने शासनांस अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यामुळे ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे 7 वा वेतन आयोगानुसार वेतनत्रुटी आहेत , अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटीमध्ये सुधारणा होणार आहे .

Leave a Comment