मराठी पेपर , राहुल पवार प्रतिनिधी : कर्मचाऱ्यांना अनेक वेळा पगार वेळेवर न होणे , कर्जांच्या ओझांमुळे बऱ्याच वेळा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो . यामुळे कर्मचाऱ्यांना या संकटांचा सामना करण्यासाठी आगाऊ वेतन देण्याचा मोठा निर्णय गोवा राज्य सरकाच्या मुख्यमंत्री यांनी घेतला आहे .सरल पगार योजना नेमकी काय आहे , पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
गोवा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना अवेळी उद्धवणाऱ्या आरोग्याच्या कारणास्तव अथवा अन्य आकस्मिक कारणांस्तव खर्च करण्यासाठी आगाऊ वेतन मिळणार आहे .अशा प्रकारे कर्मचाऱ्यांसाठी योजना तयार करुन कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी आगाऊ पगार देणारे गोवा राज्य सरकार हे पहिलेच राज्य ठरले आहेत .
हे पण वाचा : जुनी पेन्शन योजनेमध्ये तडजोड नाहीच , परत आंदोलनाचा इशारा !
ॲपद्वारेच मिळणार आगाऊ पगार – कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचणीच्या प्रसंगी रिफाईन ॲपवर रिक्वेस्ट टाकुन आगाऊ पगार मिळवू शकणार आहेत . यांमध्ये उद्धवणारी अडचण नमुद करावी लागणार आहे . तसेच जेवढी आगाऊ वेतन घेतली जाईल त्या प्रमाणानुसार 9 रुपये ते 149 शुल्क भरावी लागणार आहे .यामुळे गोवा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा आर्थिक फायदा झालेला आहे , असे गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले .
रिफाईन ॲप असे करते काम – रिफाईन हे ॲप वापरण्यास खुपच सोपे असून हे ॲप क्रेडिट कार्ड प्रमाणे काम करते , परंतु यावर आगाऊ वेतन मिळते तसेच कोणतेही व्याज आकारले जात नाहीत .यामध्ये काही सेंकदातच आगाऊ वेतनाची रिक्वेस्ट टाकुन पैसे खात्यात येतील