मराठी पेपर , राहुल पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिडिया रिपोर्ट्सनुसार समोर येत आहे . नविन वेतन / 8 वा वेतन आयोगांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लाक्षणिक वाढ होणार आहे , पगारात तब्बल 44 टक्क्यांहून अधिक वाढ होणार आहे .
संसदेमध्ये अर्थराज्यमंत्री यांनी केला नविन वेतन आयोगाचा उल्लेख – केंद्रीय अर्थराज्यमंत्री श्री.भागवत कराड यांनी संसदमध्ये नविन वेतन आयोग ( 8 th Pay Commission ) चा उल्लेख संसदेमध्ये केला , यानुसार लोकसभा निवडणीच्या नंतर नविन वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यायत येत आहेत . याकरीता पुर्व नियोजन / वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येणार आहेत .
नविन वेतन आयोगांमध्ये होणार मोठी वाढ
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मुळ वेतनाचा फिटमेंट फॅक्टर हा 2.57 पट आहे तर यांमध्ये वाढ करुन नविन वेतन आयोगांमध्ये 3.68 पट वाढ करण्याची शिफारस कामगार युनियन कडून करण्यात आलेली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतन हे सध्या सातव्या वेतन आयोगांमध्ये मिळते असणारे किमान मुळ वेतन 18,000/- मध्ये वाढ होवून नविन वेतन आयोगांमध्ये किमान मुळ वेतन हे 26,000/- रुपये होईल .
पुढील वर्षी होणार वेतन आयोगाची स्थापना –
दर दहा वर्षांनी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोगा लागू करण्यात येत असतो , सातवा वेतन आयोग सन 2016 मध्ये लागु करण्यात आला होता , यानुसार आता सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग लागु करण्यात येईल , याकरीता पुर्व नियोजन / संकलन यांकरीता पुढील वर्षी सन 2024 मध्ये नविन वेतन आयोगाची स्थापना करण्यात येईल .