राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीची पुनर्रचना करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून दि.10 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासन वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2023 अन्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS ) प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाय योजना शिफारस / अहवाल सादर करण्यासाठी सकितीची स्थापना करण्यात आलेली होती .
या समितीची पुनर्रचना वित्त विभागाच्या सदर नमुद शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे .यामध्ये श्री.सुबोध कुमार , भारतीय प्रशासन सेवा मधून सेवानिवृत्त असणारे अधिकारी या समितीचे अध्यक्ष असणार आहेत . तर श्री.के.पी .बक्षी ( सेवानिवृत्त भा.प्र.से ) , श्री.सुधीरकुमार श्रीवास्तव ( सेवानिवृत्त भा.प्र.से ) यांची सदस्य म्हणून तर संचालक , लेखा व कोषागारे यांची सचित म्हणून सदर समितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे .
सदर समितीची पुनर्रचना करणेबाबतचा वित्त विभागाचा दि.10.04.2023 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .