Employee : सरकारी कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व सेवानिवृत्तीचा 50/55 वर्षे अथवा 30 वर्षे सेवानियम लागु होणार ,कडक कारवाईचे आदेश !

Spread the love

मराठी पेपर ,संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांचे वय 50/55 वर्षे असताना अथवा सेवेचे 30 वर्षे पुर्ण झालेल्या अकार्यक्षम ( सेवेत राहण्यास अपात्र ) असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुदतपुर्व सेवानिवृत्ती देण्याचा निर्णय केंद्र तसेच राज्य शासनांकडुन घेण्यात आलेले आहेत . परंतु अकार्यक्षम असून देखिल अपात्र कर्मचाऱ्यांना मुदतपुर्व सेवानिवृत्ती दिली जात नाही , परिणामी शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे .

यामुळे आता या निर्णयांची अंमलबजावणी अधिक कडक व गोपनिय पद्धतीने करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या DOPT कार्यालयांकडून निर्गमित झालेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार ( Office Memorindem ) नमुद करण्यात आलेले आहेत .जे अधिकारी / कर्मचारी आता 50/55 वर्षांचे आहेत किंवा सेवेचे 30 वर्षे पुर्ण केले आहेत अशा कर्मचाऱ्यांचे सेवेत राहण्याची पात्रपात्रता आजमविण्यात येणार आहे . याकरीता वैद्यकिय तसेच कार्यालय प्रमुखांकडून गोपनिय अहवालानुसार पात्रपात्रता ठरविण्यात येणार आहेत .

मुदतपुर्व सेवानिवृत्ती म्हणजे काय ? – केंद्रीय नागरी सेवानियम 1972 मध्ये मुदतपुर्व सेवानिवृत्तीची तरतुद करण्यात आलेली आहे . यानुसार सार्वजनिक हिताकरीता / शासकीय कामकाजांमध्ये अडथळा निर्माण होवू नये याकरीता मुदतपुर्व सेवानिवृत्तीची तरतुद करण्यात आलेली आहे .म्हणजेच अकार्यक्षम केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या 60 वर्षांपुर्वीच मुदतपुर्व सेवानिवृत्ती दिली जावू शकते .

हे पण वाचा : पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये फक्त एक वेळा गुंतवणूक करून प्रतिमहा मिळवा चांगली मोठी रक्कम !

मुदतपुर्व सेवानिवृत्ती देत असताना , सदर कर्मचाऱ्यांस पुढील तीन महिन्यांचे आगाऊ वेतन देवून सेवानिवृत्ती देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे , अशा वेळी सदर कर्मचाऱ्यांस आगाऊ तीन महिन्यापुर्वीच लेखी सुचना देण्याचा सेवानियम आहे .

यांमध्ये अधिकारी / कर्मचारी वयांच्या 50/55 वर्षे पार केल्यास सदर कर्मचाऱ्यांचे मुल्यांकन करण्यात येते , तसेच संवर्ग ड मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांची शारीरिक क्षमता देखिल तपासणी केली जाते .सदरचा रेकॉर्ड पुनर्विलोकन समितीसमोर मांडले जाते , सदर रेकॉर्ड नुसार पुनर्विलोकन समिती अधिकारी / कर्मचाऱ्यांची पात्रपात्रता तपासून अपात्र अधिकारी / कर्मचाऱ्यांना मुदतपुर्व सेवानिवृत्ती देण्यात येते .

शासकीय कर्मचारी , नोकर पदभरती , सरकारी बातम्या / योजना व राजकिय / सांस्कृतिक व कला , क्रिडा यांच्या चालु घडामोडींच्या अपडेट साठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .

Leave a Comment