Property : पित्याने मुलांच्या नावावर संपत्ती केली असल्यास , मुलगी पित्याच्या संपत्तीवर न्यायालयात दावा करु शकते का ? कायदा काय सांगतो पाहा !

Spread the love

मराठी पेपर बालीजी पवार : हिंदु उत्तराधिकार कायद्यांमध्ये यापुर्वी मुलींना वडोपार्जित संपत्तीमध्ये समान अधिकर नव्हते परंतु हिंदु उत्तराधिकार कायदा 1956 या कायद्यांमध्ये कायद्यांमध्ये सन 2005 मध्ये सुधारणा करुन मुलींना देखिल वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान हक्क देण्यात आलेले आहेत .म्हणजेच वडिलोपार्जित सर्व संपत्तीमध्ये मुलांना जेवढा अधिकारी आहे तेवढाच अधिकर मुलींनाही देण्यात आलेला आहे .

परंतु अनेकवेळा वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वडिलांचा मृत्यु झाल्यास सदर वडिलोपार्जित संपत्तीमध्ये भावंडाची संपत्तीसाठी भांडणे होतात , या साठी कायद्यांमध्ये असे नमुद करण्यात आलेले आहे कि , जर वडिल जिवंत असतानाच त्यांची संपत्ती मुलांच्या नावावर हस्तांतरीत केली असल्यास त्या संपत्तीवर मुलींना कोणताही हक्काचा दावा करता येणार नाही .

परंतु वडीलांचा मृत्युपत्राशिवाय ( मृत्युपत्र  न लिहिता ) मृत्यु झाल्यास अशा वेळेस मृत्य व्यक्तींच्या मालमत्तेंमध्ये मुलींना संपत्तीमध्ये समान हक्क आहे , जर भावंडे देत नसल्यास मुली न्यायालयांमध्ये दावा करु शकते .यांमध्ये मृत्यु झालेल्या व्यक्तींचा संपत्तीमध्ये प्रथम वर्ग 1 नुसार वारसांच्या यादीत त्याची पत्नी , मुले आणि आई यांचा समावेश होत असतो .म्हणजेच वारसांमध्ये मृत्य पुरुष व्यक्तींची पत्नी , मुले आणि आई संपत्तीचे समान वारस असतात .

हे पण वाचा : आता रेशनकार्ड धारकांना मिळणार , धान्याऐवजी पैसे !

स्व-अधिग्रहित संपत्ती म्हणजे काय ? – स्वअधिग्रहित संपत्ती म्हणजे वडीलांच्या इच्छेने एखादी संपत्ती कोणाला द्यायची हे सर्वस्व वडीलांच्या इच्छेवर अवलंबून असते , जर एखादी संपत्ती मुलींनी द्यायची नसल्यास अशा वेळी मुलगी काहीही करुन शकत नाही तर कायदेशिर दावा देखिल करु शकत नाही .

हे पण वाचा : पत्नीच्या नावावर खरेदी केलेली संपत्ती कोणाला मिळते , जाणून घ्या कोर्टाला निकाल !

Leave a Comment