हिमाचल प्रदेश राज्य कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठी खुशखबर दिलेले आहे , ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये आणखीण तीन टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे . यामुळे हिमाचल प्रदेश राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे .
काल दि.16 एप्रिल 2023 रोजी हिमाचल प्रदेश राज्याचे 76 व्या दिनाच्या दिवशी राज्य कर्मचाऱ्यांना खुशखबर देण्यात आलेली आहे . हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री श्री. सुखविंदर सिंह सुक्सू यांनी कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून होणारी डी.ए वाढीच्या मागणीला अखेर मान्य करत राज्यातील कर्मचाऱी वे पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीची मोठी भेट दिलेली आहे .
डी.ए मध्ये 3 टक्क्यांची वाढ – हिमाचल प्रदेश राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सध्या 31 टक्के प्रमाणे डी.ए अदा करण्यात येत होते . आता यामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात आलेली असल्याने हिमाचल प्रदेश कर्मचाऱ्यांना एकुण 34 टक्के प्रमाणे महागाई भत्ता अनुज्ञेय होणार आहे .
या डी.ए वाढीचा राज्यातील सुमारे 2.16 लाख कर्मचारी व 1.90 लाख पेन्शनधारकांना लाभ होणार आहे . या डी. ए वाढीमुळे हिमाचल प्रदेश राज्य सरकारच्या तिजोरीवर 500/- कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा येणार आहे .
सदरचा वाढीव महागाई भत्ता हा हिमाचल प्रदेशातील कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यांच्य वेतन / पेन्शन देयकासोबत प्रत्यक्ष रोखीने अदा करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा हिमाचल प्रदेश राज्य सरकारने केली आहे .या निर्णयामुळे हिमाचल प्रदेश राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा आनंदा झालेला आहे , विशेष म्हणजे हा निर्णय सुट्टीच्या दिवश म्हणजेच रविवारी घेण्यात आला आहे .
- सोयाबीन , कापूस , तुरी ,मका लागवडीमध्ये 13 टक्क्यांनी घटले ; तर अतिवृष्टीमुळे उत्पादनांमध्ये घट , यामुळे यंदा बाजारभाव वाढणार !
- राज्यात पुढील 3 ते 4 दिवसांत पुन्हा पावसाचा जोर वाढणार ; जाणुन घ्या नविन अंदाज !
- सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणेबाबत , राज्य शासनांकडुन महत्वपुर्ण GR निर्गमित ; दि.14.08.2024
- शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत , शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन !
- शेतकऱ्यांना नवीन शेत जमीन खरेदी करण्यासाठी “या” बँकेकडून मिळत आहे , सुलभ कर्ज.