10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश !

Spread the love

@marathipepar चंदना पवार प्रतिनिधी [ Instructions through the Finance Department to implement the Revised In-Service Assured Progress Scheme with three benefits of 10, 20 and 30 years. ] : 10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश देणेबाबत राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 03.07.2025 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .

सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेच्या 10 , 20 व 30 वर्षे सेवा पुर्ण झाल्याच्या नंतर पदोन्नतीची / पे-स्केल मधील पुढील वेतनश्रेणी लागु करण्यात येते . यालाच आश्वासित प्रगती योजना असे म्हणतात .

वित्त विभागाच्या दिनांक 03.07.2025 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्याच्या उप-सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे . सदर पत्राचा विषय हा राज्यातील शिक्षकांना तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती ( 10 ,20 व 30 वर्षे ) योजना लागु करणेबाबत असा आहे .

यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य सल्लागार / राज्य कोषाध्यक्ष / राज्य कार्याध्यक्ष / राज्यसचिव / राज्याध्यक्ष , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांचे दिनांक 10 जुन 2025 रोजीचे पत्र जोडण्यात येत आहेत .

हे पण वाचा : अशी असेल आठवा वेतन आयोगाची रचना ?  फिटमेंट फॅक्टर , सुधारित भत्ते / वेतनश्रेणी व पेन्शन वृद्धी !

सदर पत्रातील विषय हा शालेय शिक्षण व क्रिडा विभागाशी संबंधित असल्याने , सदर मुळ पत्र नियमानुसार उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेला आहे . तरी नियमानुसार उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment