Kusum Solar Pump Details | दीड लाख रुपयांचा सोलर पंप फक्त बसवा वीस हजार रुपयात! प्रशासनाने राबवली खास शेतकऱ्यांसाठी ही योजना !

Spread the love

मराठी पेपर , राहुल पवार प्रतिनिधी : Kusum Solar Pump Details :- आज शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलो आहोत. आजच्या लेखामध्ये आपण शेतकऱ्यांना खरोखर दिलासा देणाऱ्या योजनेबद्दल विशेष चर्चा करणार आहोत. शेतकरी बंधू-भगिनींना त्यांच्या शेतीला दिवसा आठ तास सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवली आहे.

आता फक्त 20,000 रुपयांमध्ये शेतकरी बंधू-भगिनींना कृषी सोलर पंप मिळणार असून योजनेच्या माध्यमातून हा सोलर पंप नक्की कसा घेता येईल? किती एचपी करिता किती रुपये आपल्याला द्यावे लागतील? पंप नक्की कशाप्रकारे काम करतो? याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण आजच्या लेखांमध्ये पाहूया.

Kusum Solar Pump Details

शेतासाठी लागणारी लाईट दिवसा टिकत नसल्यामुळे शेतकरी बंधू भगिनींना रात्री अप रात्री पिकाला पाणी देण्यास पळावे लागते. या गोष्टीवर विचार करून प्रशासनाने आतापर्यंत विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकरी बंधू-भगिनींना 90 टक्के व 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे शेतकरी बंधू-भगिनींना त्यांना पाहिजे तेव्हा पिकांना पाणी देता येईल.

सोलर पंप कोटा कसा चेक करावा ?

सौर कृषी पंपामुळेच आता सर्व पिकांना अगदी वेळोवेळी पाणी देता येणार आहे. विशेष बाब सांगायची झाली तर हा सोलर पंप तुम्ही फक्त 20,000 रुपयात बसू शकता. तीन एचपी चा सोलर पंप नक्की तुम्हाला रुपयात मिळू शकतो.

कुसुम सोलर पंप योजना

देशभरातील सर्वच शेतकरी बंधू-भगिनींना दिवसा पिकांना पाणी देता यावे यासाठी प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना राज्यभरात राबविण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कृषी सोलर पंप योजना याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यात येत आहे. प्रशासनाने राबवलेल्या या योजनेच्या अंतर्गत शेतकरी बंधू-भगिनींना तीन एचपी पाच एचपी व साडेसात एचपी पंपांकरिता अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.

केंद्र सरकारने स्वतः हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून जे शेतकरी एससी एसटी प्रवर्गात मोडत आहे त्यांना 95 टक्के अनुदानावर कृषी सोलर पंप उपलब्ध करून देण्यात येत आहे व जे शेतकरी ओपन ओबीसी कॅटेगरीमध्ये मोडत आहेत त्यांना 90 टक्के अनुदानावर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Leave a Comment