राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मध्यवर्ती कर्मचारी संघटना , महाराष्ट्र मार्फत मोठे आव्हान ; प्रसिद्धीपत्रक निर्गमित दि.25.04.2024

Spread the love

Marathiprasar प्रणिता पवार प्रतिनिधी , नाशिक : राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मतदान करताना सजगता बाळण्याबाबतचे , राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र मार्फत दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण  प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .

सदर प्रसिद्धीपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सद्यस्थितीतील केंद्र सरकार हे सातत्याने कामगारांवर अन्याय करीत असून भांडवलदारांचे हित जोपासत आहेत , तसेच भांडवलदारांच्या दबावापोटी कामगार संघटनांनी 130 वर्षापासून लढून मिळविलेले 44 कामगार कायदे रद्द करुन त्या जागी 4 श्रमसंहिता आणल्या आहेत , कामगार विरोधी मिळविलेले 44 कामगार कायदे रद्द करुन त्या जागी 4 श्रमसंहिता आणल्या आहेत .

कामगार विरोधी धोरणांमुळे कायम स्वरुपाच्या नोकऱ्या संपुष्टात येणार आहेत , खाजगीकरण आणि कंत्राटीकरणद्वारे सरकारी आणि सार्वजनिक सेवांमधील कर्मचारी पदभरती थांबविण्यात आली असून , अनेक कामे आऊट सोर्सिंगद्वारे करुन घेण्यात येत आहेत . तसेच केंद्र सरकारी कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचारी यांचे भविष्य अंध : कारमय करणारा अंशदायी पेन्शन योजना PFRDA कायदा रद्द करण्यासाठी लाखो कर्मचाऱ्यांनी सातत्याने देशव्यापी आंदोलने करुनही सरकार या संदर्भात दुराग्रह सोडायला तयार नाही .

हे पण वाचा : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये आत्ताची मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

तसेच केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना दर 10 वर्षांनी होत असते , त्यांचा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा होतो , सांप्रत केंद्र सरकारने अद्याप 8 वा वेतन आयोगाची स्थापना केलेली नसुन तसा विचारही नसल्याचे निवेदन संसदेत केले आहेत . ही बाब अतिशय गंभरी आहे .देशात लक्षावधी सरकारी पदे रिक्त असून त्या पदांचा कार्यभार कार्यरत कर्मचाऱ्यांना सांभाळावा लागत असल्याने , त्यांची मानसिक व शारिरीक अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे .

तसेच आशा वर्कर्स , अंगणवाडी , महिला परिचर यांच्या मानधन वाढीचा प्रश्न संपुर्णतया सुटलेला नाही , त्यांना कामगार हा दर्जा देण्यासही सरकार तयार नाही .तसेच देशातील शेतकरी संकटात असून स्वामीनाथन आयोग लागू करावा , शेतमालाला आधारभूत दर द्या या मागण्यांबाबत आश्वासन देवूनही सरकार अंमलबजावणीस टाळाटाळ करीत आहे . या कारणाने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणे वाढत चालले आहेत .

यामुळे सदर निवडणूकीत कामगार – कष्टकरी यांचे हित लक्षात घेवून कर्तव्यभावनेने मतदानाचा हक्क बजावणी आवश्यक आहे , सर्व कर्मचाऱ्यांनी कामगार विरोधी , शेतकरी विरोधी , जनता विरोधी , संविधान व लोकशाही विरोधी तत्वांचा पराभव करण्यासाठी सजगतेने मतदान करावेत असे आवाहन सदर प्रसिद्धीपत्रकानुसार संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांच्याकडून करण्यात आले आहेत . या संदर्भातील सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment