राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024

Spread the love

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee raja rokhikaran & Amount transfer to NPS Account ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व एनपीएस खाती रक्कम वर्ग करणेबाबत असे दोन महत्वपुर्ण शासन निर्णय काल दि.27 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत .

रजा रोखीकरणाच्या रकमेवरील व्याज न्यायालयाच्या आदेशान्वये निवृत्त कर्मचाऱ्यांच्या खाती जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर प्रकरण हे श्री.एस.टी डोंगरे उप जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी , यवतमाळ ( सेवानिवृत्त ) यांच्या प्रकरणी मा.उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार सदरचे शासन निर्णय राज्य शासनांच्या कौशल्य व रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग मार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या प्रकरणी माहे जानेवारी 2021 ते माहे डिसेंबर 2024 पर्यंत रजा रोखीकरणाची एकुण देय रक्कम व त्यावर 6 टक्के व्याजदराने व्याजाची रक्कम अदा करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे . यांमध्ये व्याजाची एकुण रक्कम ही 1,74,097/- रुपये इतकी होत आहे .

मा.उच्च न्यायालय , खंडपीठ नागपुर यांनी दि.03.05.2024 रोजीच्या दिलेल्या आदेशास अनुसरुन श्री.एस.टी .डोंगरे उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी , यवतमाळ ( सेवानिवृत्त ) यांना अदा करावयाची रजा रोखीकरणाची रक्कम रुपये 8,70,480/- या वरील व्याज रक्कम रुपये 1,74,097/- रुपये मा. न्यायालयामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

हे पण वाचा : कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024

म्हणजेच श्री. डोंगरे यांना निवृत्तीनंतर रजा रोखीकरणाची रक्कम अदा करण्यास झालेल्या विलंबाकरीता मा.न्यायालयाच्या आदेशानुसार 6 टक्के दराने व्याज मा.न्यायालयात जमा करण्यासाठी होणारा खर्च 115 लिव्ह इनकॅशमेंट बेनिफिट्स 04 पेन्शनरी चार्जेस , 12 इंट्रेस्ट ऑन डिलेट पेमेंट या लेखाशिर्षातून भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment