राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Positive discussions held with the Minister on various issues of state employees ] : राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर दिनांक 25 मार्च 2025 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली , यांमध्ये विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली .

यांमध्ये आदिवासी विकास विभागातील अनुदानित आश्रमशाळे करीता विशेष बाब म्हणून 1433 कर्मचाऱ्यांचे थकबाकी वेतन अदा करण्यात यावेत , आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे सकाळच्या भोजनाची वेळ बदलुन सकाळी 10.00 वाजता करण्यात यावे .

जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करण्यात यावी , शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन हे 01 तारखेलाच व्हावेत . तसेच आदिवासी / नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणाऱ्या प्रोत्साहन भत्ता म्हणून मुळ वेतनाच्या 15 टक्के किमान 200/- रुपये तर कमाल 1500/- रुपये देण्यात यावा .

त्याचबरोबर शाळा व वसतिगृह विभाग वेगळा करण्यात यावा , त्याचबरोबर नविन आकृतीबंध रुद्द करुन विलोपित करण्यात आलेले पद पुन्हा पुनर्जिवित करण्यात यावेत . विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार वर्ग – 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी . शिक्षकांना 10, 20,30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागु करण्यात यावी .

मुख्याध्यापकांना राजपत्रित अधिकार पदाचा दर्जा देण्यात यावा , तसेच क.म.शिक्षकांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करुन देण्यात यावी . तसेच लिपिक पद सर्व शाळेवर भरण्यात यावेत . अशा विविध प्रश्नांवर राज्याचे मा.आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोकजी उईके यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक चर्चा संपन्न झाली .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment