Prime Minister Kisan Samman Nidhi Yojana: शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये भर पडावी यासाठी आर्थिक सहाय्यता म्हणून केंद्र शासनाने पी एम किसान सन्मान योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी अल्पभूधारक आहेत व आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये इतकी रक्कम दिली जात आहे. ही रक्कम प्रत्येक हंगामामध्ये दोन हजार रुपये प्रमाणे तीन हप्ते खात्यामध्ये जमा होतात. विशेष बाब सांगायची झाली तर स्वतः केंद्र शासन थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योजनेची रक्कम जमा करत आहे.
अशा सर्व शेतकऱ्यांना आतापर्यंत मोठा फायदा झाला असून आता सर्व फादर शेतकरी या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या शेतासाठी लागणारा खर्च थोडाफार पूर्ण करू शकतील. जे शेतकरी / अल्पभूधारक त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या , अशा सर्व शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत तेरा हफ्ते दोन हजार रुपयांचे देण्यात आलेले आहेत.
विशेष बाब सांगायची झाली तर आता राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा पी एम किसान सारखे एक नवीनच योजना राबविण्यात येत आहे. या गोष्टीवरती विचार करून झारखंड सरकारने त्यांच्या विभागातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता करण्याकरिता मुख्यमंत्री कृषी आशीर्वाद योजना राबवली आहे. ज्या माध्यमातून शेतकरी वर्गाला प्रति एकर मागे पाच हजार रुपये दिले जातील.
मिळालेल्या रिपोर्टनुसार खरीप हंगामामध्ये झारखंड मधील शेतकऱ्यांना झारखंडचे सरकार प्रति एकर मागे तब्बल पाच हजार रुपये देणार आहे. शेतकरी बंधू भगिनींना याचा लाभ नक्कीच घेता येईल. म्हणजे ज्या शेतकरी बंधू-भगिनींकडे पाच एकर पर्यंत क्षेत्रफळ असेल त्यांना शासन त्या हंगामामध्ये 25 हजार रुपये पर्यंत अनुदान देईल. ज्या शेतकरी बंधू भगिनींकडे एक एकर जमीन आहेत त्यांना मिळतील पाच हजार रुपये.
पी एम किसान योजनेच्या लाभार्थी व्यक्तींना सुद्धा या योजनेच्या लाभ घेता येणार नाही. यासाठी तुम्हाला फक्त शासनांतर्गत जारी केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंद करावी लागेल. या माध्यमातून आता पीएम किसान योजनेचे लाभार्थी ज्याकडे एक एकर क्षेत्रफळ आहे. अशा शेतकऱ्यांना वार्षिक 5000 आणि 6000 टोटल 11000 रुपये 31 हजार रुपये पर्यंत रक्कम मिळू शकेल जवळपास 22 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.