जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 18,939 पदांसाठी पदभरती संदर्भात राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागमार्फत दि.12.04.2023 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये गट क मधील 18 हजार 939 पदांसाठी पदभरती करण्यात येणार आहे .
यामध्ये एकुण 13 पदांसाठी पदभरती करण्यात येणार असून , पदनिहाय वेतनमान व आवश्यक पात्रता या शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .सदर जिल्हा परिषदांनी पदभरतीची माहिती व शंका निरसन करण्यासाठी /उमेदवारांना मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्याच्या सूचना देण्यात आलेले आहेत .
यामध्ये कनिष्ठ अभियंता , कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकीय ) , कंत्राटी ग्रामसेवक , औषध निर्माता , वरिष्ठ सहाय्यक , आरोग्य सेवक , आरोग्य सेवक हंमागी फवारणी कर्मचारी , आरोग्य सेविका , अंगणवाडी पर्यवेक्षिका , विस्तार अधिकारी ,विस्तार अधिकारी , पशुधन पर्यवेक्षक ,विस्तार अधकारी ( पंचायत ) कनिष्ठ लेखाधिकारी , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
पदभरती विषयास सर्वोच्च प्राथमिकता देवून , यासंदर्भातील कार्यवाहीस विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्य शासनांकडून देण्यात आलेले आहेत .सदर पदे हे गट क संवर्गातील असून सरळसेवा पद्धतीने पदभरती करण्यात येणार आहेत .
सदरची जिल्हा परिषदेचे महाभरती प्रक्रिया माहे डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश देखिल देण्यात आलेले आहेत .या संदर्भातील जिल्हा परिषदेकडून निर्गमित करण्यात आलेले शा.प डाऊनलोड करावे .