नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतमाल तारण कर्ज योजनेच्या माध्यमातून आता सुपारी, हळद, काजू, बेदाणा, मका, गहू, बाजरी, ज्वारी, करडई, धान, हरभरा, सूर्यफूल, सोयाबीन, उडीद, मूग, तूर इत्यादी शेतमालाचा समावेश करण्यात आला असून या उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या माध्यमातून गोदामामध्ये तारण ठेवल्या गेलेल्या शेतमालावर एकूण 75 टक्के पर्यंत अगदी सहा टक्के व्याज दराने तब्बल सहा महिन्याच्या कालावधी करिता त्वरित असे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे
बाजार समितीमधील जी काही गोदामे असतील त्यामध्ये ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाकरिता सर्व गोदामे भाड्याने देण्यासाठी, यासोबतच विक्री करण्यासाठी व इतर खर्चाची जबाबदारी ही बाजार समितीची असेल. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कोणतीही भुर्दंड उडणार नाही.
व्याजात सवलत;
सहा महिन्याच्या आत जे काही कर्ज घेतले आहे त्याची परतफेड करणाऱ्या बाजार समिती यांना जवळपास 3 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाईल. सर्व योजना राबवण्याकरिता स्वनिधी नसलेल्या ज्या काही बाजार समिती असतील. त्यांना सुद्धा मंडळाच्या माध्यमातून पाच लाख रुपये पर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाईल. राज्याची वखार मंडळ अंतर्गत गोदामा मधील शेतकऱ्यांचा जो शेतमाल असेल त्यांच्या मालावर तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
तारण कर्जाची मुदत व व्याजदर
शेतमालाचा जो काही प्रकार असेल त्याप्रमाणेच राज्यभरातील बाजारभावाच्या जवळपास 75 टक्के पर्यंत रक्कम किंवा प्रतिक्विंटल मागे तीन हजार रुपये रक्कम सहा महिन्यासाठी सहा टक्के व्याजदरनी दिली जाईल.
यासोबतच शेतकरी मित्रांनो काजूचे बियाणे यासोबतच सुपारीसाठी बाजारभावानुसार प्रति क्विंटल मागे जो काही दर आहे त्याप्रमाणे 75 टक्के व जास्तीत जास्त शंभर टक्के पर्यंत रक्कम उपलब्ध करून दिली जाईल. हे देखील सहा महिन्याच्या मदतीसाठी सहा टक्के व्याजदर आकारले जाईल. यासोबतच शेतकरी मित्रांनो बेदाणा पिकासाठी एकूण जी काही किंमत निश्चित केली आहे. त्यामध्ये 75 टक्के किंवा आणखी 7 000 प्रतिक्विंटल कमी दर आकारला जाईल. तो देखील सहा महिन्यासाठी सहा टक्के व्याजदर असेल.
कृषी पणन मंडळाच्या मार्फत 2022-23 या वार्षिक कालखंडाकरिता राज्यभरातील एकूण 61 बाजार समित्या असतील. त्यामधील 3200 शेतकऱ्यांचा जवळपास एक लाख 47 हजार क्विंटल शेतमाल हा पूर्णपणे तारण करून स्वीकारला जाईल. यामुळे एकूण 40 कोटी रुपयांच्या रकमेचे तारण कर्ज वितरित केले जाईल.
बाजार समिती यांच्या माध्यमातून आपल्या शेतमालाला यासोबतच शेतकऱ्यांकडून बाजार समितीला योजने संबंधित चांगला प्रतिसाद मिळाला असून, आता शेतमालावर तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरेल. या योजनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळावर जावा.