राज्य शासकीय शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना राज्य शासनांच्या सा.प्र.विभागाच्या सन 2009 व दिनांक 24.08.2017 च्या शासन परिपत्रकानुसार अतिउत्कृष्ट कामासाठी राज्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य अधिक वाढविण्यासाठी आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्याचे राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
परंतु राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या निर्देशानुसार , राज्यातील जिल्हा परिषदामधील अधिकारी / कर्मचारी यांना अतिउकृष्ट कामासाठी आगाऊ वेतन वाढी मंजुर करण्यात येवू नये अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले होते . ग्राम प्रशासन विभागांकडून आदर्श जिल्हा पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी यांना आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्यात आले नव्हते .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित !
असे आदर्श जिल्हा पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी ॲड.शिवकुमार मठपती यांच्यामार्फत न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती .सदर याचिकेवर न्यायालयाने सुनावणी दिली असून , आदर्श ग्रामसेवक / आदर्श ग्रामविकास अधिकारी प्राप्त ज्यांचे आगाऊ वेतनवाढीची वसूली करण्यात आली आहे , ही वसूल परत करण्याचे व जे आदर्श ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी दि.24.08.2027 पर्यंत आगाऊ वेतनवाढीस प्राप्त ठरतील .
अशा प्राप्त ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ फरकासह अदा करण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे .या संदर्भात ग्रामविकास विकास विभागांकडून दि.10 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला महत्तपुर्ण शासन निर्णय ( शासन निर्णय ( GR ) सांकेतांक क्रमांक – 202305101531132520 ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
शासकीय कर्मचारी / पेन्शनधारक , नोकर पदभरती , राजकीय / क्रिडा / आर्थिक व इतर चालु घडामोडींच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा